इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्येक व्यक्तीला आपले केस काळे आणि घनदाट असावे असे वाटते. विशेषत : तरुण स्त्री पुरुषांना केसांची खूपच काळजी घ्यावी असे वाटते, कारण त्यामुळे व्यक्तिमत्व छान दिसते. मात्र आजच्या काळात केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
केस गळतीच्या समस्येला तोंड देण्यासाठी काही स्त्री, पुरुष अनेक गोष्टी वापरतात, पण तरीही केसगळती कमी होत नाही. खरं तर, केसांची निगा चांगली राखण्यासोबतच निरोगी जीवनशैली आणि योग्य आहारामुळे केस गळणे थांबते. डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश करून केस गळण्याची समस्या बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते. जाणून घेऊ या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे केस गळती कमी होते.
शिमला मिरची :
प्रत्येक चायनीज पदार्थात सिमला मिरचीचा वापर केला जातो. जर अधिक पोषक तत्व हवे असतील तर पनीरसोबत अर्धी शिमला मिरची उकळून खावी, यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस गळण्याची समस्याही कमी होते.
अंडी :
अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. अशा स्थितीत केसांमध्ये फक्त अंडी घालू नयेत तर आहारात अंड्यांचाही समावेश करावा. जे नागरिक रोज अंडी खातात त्यांचे केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
मासे:
माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी2 असते. माशांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील भरपूर असते, त्यामुळे मासे खाल्ल्याने केसांची वाढ झपाट्याने होते, तर मजबूत केसांमुळे केस गळणेही कमी होते.
मसूरदाळ :
सर्व डाळींमध्ये प्रथिने असतात, परंतु केस गळती रोखण्यासाठी मसूर सर्वात प्रभावी आहे. आठवड्यातून ३ वेळा मसूर खाणे आवश्यक आहे, यामुळे काही दिवसात केस गळतीची समस्या दूर होईल.
रताळे :
रताळे बहुतेकांना आवडत नाहीत, पण जर केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर रताळ्याचा वापर नक्कीच करावा. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.