पुणे – आहाराबरोबरच निद्रा म्हणजे झोप ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे. परंतु गेल्या दीड वर्षांपासून जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे लोकांच्या झोपेसह आरोग्यावर अनेक प्रकारे विपरित परिणाम झाला आहे. लाँग कोविडच्या रूपात, लोकांमध्ये अनेक गंभीर समस्या दिसत आहेत. हृदय आणि फुफ्फुसांना हानी पोहचवण्याबरोबरच कोरोनामुळे लोकांच्या झोपेवरही विपरित परिणाम होत आहे.
वेगवेगळ्या वैद्यकिय अभ्यासामध्ये स्पष्ट झाले आहे की, कोरोनामुळे संक्रमित आणि बिगर संक्रमित अशा दोघांनाही झोपेशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक मानले जाते. झोपेची कमतरता किंवा झोपी जाण्यात अडचण आल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार उद्भवू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्या आहारासह जीवनशैलीच्या अनेक सवयी झोपेवर विपरित परिणाम करू शकतात. अनेक लोक झोपेच्या आधी अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे निद्रानाशाची समस्या वाढू शकते, या सवयींबद्दल जाणून घेणे, आणि त्यांच्यापासून दूर राहणे फार महत्वाचे आहे. झोप न लागण्याच्या म्हणजेच निद्रानाशाची समस्या वाढण्याच्या काही कारणांबद्दल आणि सवयींबद्दल जाणून घेऊ या…
मोबाईल स्क्रीनचा जास्त वापर
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपण्यापूर्वी काही वेळ मोबाईल पाहणे सध्या आपल्या सवयीचा भाग बनला आहे, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, झोपेच्या आधी स्क्रीनचा जास्त वापर केल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. कारण मोबाईल स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश डोळ्यांमध्ये अडथळा आणू शकतो, त्यामुळे निद्रानाशाचा धोका वाढतो.
झोपण्यापूर्वी चहा, कॉफी पिणे
आहारतज्ज्ञांच्या मते, कॅफीनचे प्रमाण जास्त असणाऱ्या सर्व गोष्टी रात्रीच्या वेळी टाळल्या पाहिजेत. चहा, कॉफी सारख्या बर्याच पदार्थांमध्ये कॅफीन असू शकते, याची आपल्याला माहितीही नसते, चहा प्रमाणेच सोडा, आइस्क्रीम आणि मिठाई व्यतिरिक्त, कॉफी चॉकलेटमध्येही कॅफीन जास्त असते. त्यामुळे झोपेच्या समस्या टाळण्यासाठी, या गोष्टींचे सेवन रात्री करू नये.
खाल्ल्यानंतर लगेच झोपणे
खाल्ल्यानंतर लगेच झोपायला जाणे यामुळे पोटात जळजळ, अॅसिडीटी (आंबटपणा ) सारख्या समस्या निर्माण होऊ झोपेत व्यत्यय होतो. या समस्या टाळण्यासाठी जेवण केल्यानंतर फिरायला जावे. झोपायला जाण्यापूर्वी किमान २ तास आधी जेवण घ्या. या व्यतिरिक्त, रात्री नेहमी हलके अन्न खावे, जड अन्न टाळावे, कारण ते पचायला जास्त वेळ लागू शकतो. रात्री जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
मद्य, धूम्रपान
रात्री झोपण्यापूर्वी मद्य किंवा धूम्रपान या सारखे कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका. कारण त्याचा पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो आणि झोपेची समस्या वाढते. अनेक लोकांना रात्री जास्त प्रमाणात मद्यपान करण्याची सवय असते. परंतु अल्कोहोल असलेल्या पदार्थाचे जास्त सेवन केल्याने प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. त्याचप्रमाणे, धूम्रपान किंवा तंबाखूयुक्त गोष्टी देखील झोपेबरोबर आरोग्यास हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे रात्री त्यांचे सेवन टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
——————
(सूचना – इंडिया दर्पण मधील आरोग्या संबंधित प्रकाशित झालेले सर्व लेख आणि बातम्या या तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकिय शैक्षणिक संस्थांशी संवाद साधल्यानंतर त्या आधारावर तयार केले गेले आहेत. मात्र यात नमूद केलेली तथ्ये आणि माहिती केवळ वाचकाचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी संबंधित तयार करण्यात आला आहे. तसेच अधिक माहितीसाठी कोणतीही रोगाबद्दल अधिक तपशीलांसाठी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)