ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोड पदार्थ अनेकांना आवडतात, तर तिखट पदार्थ काही जणांना आवडत नाहीत. याउलट काही जण तिखट पदार्थांवर ताव मारतात. तर गोड खात नाहीत, लाल मिरची असो हिरवी मिरची तिखटच असते. हिरव्या मिरचीमध्ये देखील काही चांगले गुणधर्म आहेत. रक्तदाब ते कॅन्सरपर्यंच्या अनेक आजारावर हिरवी मिरची गुणकारी ठरते. काही जणांना जेवताना मिरची खाण्याची सवय असते, त्यामुळे मिरचीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
जेवणसोबत खाल्ली जाणारी हिरवी मिरची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. हिरवी मिरची आपल्या पचन तंत्रासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या अन्नामध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळते. हिरवी मिरची फायबर पचवण्यास मदत करते.
हिरवी मिरची ब्लड शुगर लेव्हल कमी करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचे आहे. तसेच हिरवी मिरची शरीरातील मेद कमी करुन मेटाबॅालिजम वाढवते. हिरव्या मिरच्यामध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीराचे बॅक्टेरिया नष्ट करतात.
जगभरात असे अनेक देश आहेत , जेथे नागरिकांना प्रचंड तिखट खायला आवडते. भारतात देखील असे अनेक नागारीकांना खूप तिखट खायला आवडते. महाराष्ट्रात देखील अनेकांकांना खूप तिखट खायला आवडते. वडापाव आणि त्या सोबत तिखट हिरवीगार मिरची सर्वांनाच खूप आवडते. असे अनेक पदार्थ आहेत ,ज्या पदार्थासोबत तोंडी लावायला मिरची आवडते.
हिरवी मिरची अन्नाची चव वाढवते. अनेकांना तर हिरव्या मिरचीशिवाय जेवण अपूर्णच वाटते. हिरव्या मिरचीचा वापर हा खूप जण करत असतात. हिरवी मिरची झणझणीत असल्याने खूप जण ती खात नाहीत. मात्र हिरव्या मिरचीमध्ये देखील काही चांगले गुणधर्म आहेत.
मिरचीमध्ये असलेले Capsaicin आपल्या नाकातील Mucus Membranes उत्तेजित करते ज्यामुळे आपली बंद असलेली श्वसन प्रणाली उघडते आणि सर्दी खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो. तसेच ब्लड प्रेशरमुळे हृदयाच्या समस्यांसोबतच इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. हिरव्या मिरचीमध्ये आढळणारे कॅप्साइसिन ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
जेवताना जर मिरचीचे सेवन केले तर तुमच्या त्वचेला एक वेगळेच तेज येते. चेहऱ्यांवरील डाग व धब्बे निघून जातात. त्वचेला एक वेगळीच चमक येते. त्यामुळे जेवताना जर तुम्ही एखादी मिरची खाल्ली किंवा तोंडी लावली तर तुम्हाला नक्कीच चांगली चमकदार त्वचा मिळू शकते.
मिरची नैसर्गिक पेनकीलर म्हणजेच वेदनाशामक गोळीच आहे म्हणजेच काही वेदना होत असतील तर त्या मिरची दूर करते. मिरची ही वेदना दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अनेकदा आपले पूर्वज देखील काही दुखत असेल मिरची खाण्याचा सल्ला देतात.
लठ्ठपणामुळे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही हिरव्या मिरच्यांचे सेवन केले तर ते वजन वाढण्याच्या समस्येपासून थोडा दिलासा मिळू शकतो.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी हिरवी मिरची फायदेशीर ठरते. मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन असते जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्याचा शरीराला देखील मोठा फायदा होतो. हिरव्या मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या पोषक तत्वांसह अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हिरव्या मिरचीमध्ये आढळणारे हे गुणधर्म आणि पोषक तत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
मिरचीमुळे कॅन्सरला बऱ्याच अंशी दूर ठेवू शकता. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या शरीराला फ्री रेडिकल्सपासून संरक्षण देऊन कॅन्सरचा धोका कमी करतात. मात्र, कॅन्सर हा असा आजार आहे की तो दूर ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी हिरवी मिरची देखील खाऊ शकतो.
मात्र हिरवी मिरची जास्त खाल्ल्याने पोटात ज्या प्रकारची केमिकल रिएक्शन होते. त्यामुळे पोटात जळजळ होणे, फुगणे यासारख्या समस्या होतात. हिरवी मिरची देखील एसिडिटीचे कारण असू शकते, त्यामुळे मिरचीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
Health Tips Green chilly Food Benefits Nutrition Side Effects