विशेष प्रतिनिधी, मुंबई
वजन कमी करणे हे अनेकांपुढे सर्वांत मोठे आव्हान आहे. मात्र त्यासाठी रडत बसण्यापेक्षा एक टास्क म्हणून ते स्वीकारणे आणि डाएट व लाईफस्टाईलवर विशेष लक्ष देणे हाच उत्तम मार्ग आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ नेहमी व्यायाम करण्याचा सल्ला देतात. कारण व्यायाम केल्याने कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होते. पण नेमका कोणता व्यायाम करायचा आणि किती वेळ करायचा याबाबत कमालीचा संभ्रम लोकांमध्ये आहे.
High knees करा
जमिनावर उभे होऊन दोन्ही हात सावधान मुद्रेत ठेवा. त्यानंतर पाय उचलून छातीपर्यंत आणा. उलट्या आणि सरळ पायांनी असे करायचे. हा क्रम किमान दहा वेळा करा.
Jumping jacks करा
यासाठी सूर्याच्या दिशेने तोंड करून सावधान मुद्रेत उभे व्हायचे आणि दोन्ही हात बाजुला ओढायचे. दोन्ही हात हवेत हलवायचे. याच क्रमाने उडी घेऊन पायदेखील उचलायचे व पुन्हा सावधान मुद्रेत यायचे. हा व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहील.
Goblet squat कसे करायचे?
यासाठी सरळ उभे राहून दोन्ही हातांमध्ये डंबेल्स पकडायचे. त्यानंतर दोन्ही हात पुढे आणा. आता खुर्चीवर बसण्याच्या मुद्रेत यायचे. काही वेळ थांबल्यानंतर पुन्हा पहिल्या मुद्रेत या. हा व्यायाम दररोज दहावेळा करा.