पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळवण्याची जणू काही घाई झालेली असते, कोणीही सहनशील राहीलेले नाहीत, आता प्रत्येकाला झटपट परिणाम हवे असतात, खाण्यापिण्याच्या बाबतही अशीच परिस्थिती असते, त्यामुळे बहुतांश जण एनर्जी बूस्टिंग ड्रिंक्सकडे वळणे आश्चर्यकारक नाही. कारण ही पेये प्यायल्यावर अनेकांना झटपट एनर्जी मिळते.
एनर्जी ड्रिंक्स पिणे हा आजकाल फॅशनचा भाग बनला असेल, पण ते खरेच आरोग्यला चांगले आहे का?तर तज्ज्ञांच्या मते, या एनर्जी ड्रिंक्सपासून शक्य तितके दूर राहिले पाहिजे. ही पेये शरीराची झटपट उर्जा भरू शकतात, परंतु ते केवळ दीर्घकाळ हानी करतात. जेव्हा आपण सहलीला किंवा पर्यटनस्थळी जातो किंवा आपल्या कामामुळे थोडे सुस्त वाटते, तेव्हा आपण एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतो. परंतु त्यात साखर आणि कॅफीनचे प्रमाण जास्त असल्याने ते आपल्या शरीराला हळूहळू हानी पोहोचवते, त्याचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर आणि दातांवर दिसून येतो. हे दातांचा इनॅमल नष्ट करते, त्यामुळे दातात अति संवेदनशीलता, पोकळी इत्यादी समस्या सुरू होतात.
तसेच एनर्जी ड्रिंक्स कॅफिनने भरलेले असतात, ही चिंतेची बाब आहे. अर्धा लिटर एनर्जी ड्रिंकमध्ये किमान 200 ग्रॅम कॅफिन असते, जे 500 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. कॅफिनच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, भीती आणि कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. यातून कॅफिनच्या उच्च डोससह साखरेचा उच्च डोस देखील पोटात जातो. त्यामुळे वजन वाढू लागते. एनर्जी ड्रिंकच्या अर्ध्या लिटर बाटलीमध्ये 220 कॅलरीज असतात. ज्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
याच्या सेवनाने अस्वस्थता व चिंता वाढू शकते. तसेच काही नागरिकांमध्ये, आनुवंशिकतेमुळे चिंताग्रस्त समस्या उद्भवू शकतात. एडेनोसिन रिसेप्टर्समधील कोणताही बदल नियमितपणे एनर्जी ड्रिंक्स वापरणाऱ्यामध्ये चिंता निर्माण करू शकते, कारण त्यातील जास्त कॅफिनमुळे असे होते.
एनर्जी ड्रिंक्स पिण्याचा आणखी एक तोटा म्हणजे कॅफिनचे व्यसन लागते. प्रत्येक वेळी व्यायाम करण्यापूर्वी याची बाटली प्यावेशी वाटते. एनर्जी ड्रिंक्सचा वापर शरीरात झटपट एनर्जी वाढवण्यासाठी केला जातो. यामुळेच लोक व्यायाम करताना किंवा कोणताही खेळ खेळताना ते पितात. त्याने शरीरात पाण्याची कमतरता होते. मात्र कॅफीनच्या उच्च पातळीमुळे मूत्रपिंडाचे कार्य बिघडते.
Health Tips Energy Drinks Habit side effects