इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अंड्यामध्ये अनेक गुणधर्म असतात, त्यामुळे मानवी आरोग्याला फायदा होतो. मात्र, वयाच्या चाळीशीनंतर अंडी खावीत की नाही, असा प्रश्न अनेकदा पडतो. सन 2016 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, सर्व वयोगटातील व्यक्तींनी अंड्यांचा आहाराचा घेतला पाहिजे. संतुलित आहारात दररोज अंडी ठेवलीत तर स्नायू मजबूत होतात. याव्यतिरिक्त, सारकोपेनियाशी संबंधित गुंतागुंत, मृत्यू आणि आरोग्य सेवेचा धोका देखील कमी केला जाऊ शकतो. एका मोठ्या उकडलेल्या अंड्यामध्ये 77 कॅलरीज, 0.6 ग्रॅम कार्ब, 5.3 ग्रॅम फॅट, 212 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 6.3 ग्रॅम प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी5, फॉस्फरस आणि सेलेनियम असतात. अंडी हे अमीनो ऍसिडचे समृद्ध स्त्रोत आहेत, तसेच ते प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जातात.
वृद्ध व्यक्तींमध्ये कमी होत जाणारे स्नायू भरून काढण्यात अंडी महत्त्वाची भूमिका बजावतात. बरेच वृद्ध त्यांच्या प्रथिनांची आवश्यकता आहाराद्वारे पूर्ण करू शकत नाहीत. वाढत्या वयात अंडी हे पोषणाचा उत्तम स्रोत आहे. वैद्यकीय पुरावे सिद्ध करतात की, दिवसाच्या प्रत्येक जेवणासोबत प्रथिने घेतल्याने वृध्दांमध्ये स्नायू वाढण्यास मदत होते. अंडी फार महाग नसतात, सर्वत्र उपलब्ध असतात आणि पचायला सोपी असतात. ती उच्च-गुणवत्तेचे प्रथिनांने समृध्द असतात आणि त्यात भरपूर प्रमाणात ल्युसीन असते. हा एक प्रकारचा अमिनो आम्ल आहे, जो स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय अंड्यांमध्ये व्हिटॅमिन-डी आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडही असतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी आठवड्यातून किमान 7 अंडी खावीत. तसेच अंडी हे चांगले कोलेस्टेरॉल चे सर्वोत्तम स्त्रोत असल्याचे म्हटले जाते आणि वृद्ध व्यक्ती अंडी हे इतर कोणतेही प्रथिन स्त्रोत म्हणून घेऊ शकतात. अंडी हे उकळून खाता येते किंवा तेलात तळूनही खाता येते.
(सूचना: या बातमीत नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत. त्या व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. काही प्रश्न किंवा समस्या असल्यास आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)