पुणे – बदलेली जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या विविध सवयींमुळे गेल्या काही वर्षांमध्ये हृदयरोगाचे रुग्ण खूपच वाढले आहेत. दशकभरापूर्वी वय वाढलेल्या किंवा ज्येष्ठ व्यक्तींमध्ये हृदयरोगींचे प्रमाण अधिक होते. मात्र आता कमी वयात म्हणजेच युवकांमध्येही हृदयरोगाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे.
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांना हृदयरोगाचा धोका वाढला आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की धमण्यांमध्ये अडथळे निर्माण करते. परिणामी रक्ताभिसरण बाधित होते. अशा रुग्णांना कोरोनरी आर्टरी डिसिस, हृदयाची गती थांबणे, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा तीव्र धक्का येण्याची शक्यता बळावते.
आरोग्यतज्ज्ञ सांगतात, की खाण्याच्या सवयी बदलल्या तर हृदयरोगींची जोखीम ६० टक्के कमी केली जाऊ शकते. बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणार्या अन्नपदार्थांचा समावेश आपल्या जेवणामध्ये करणे आवश्यक आहे. दररोज जेवणामध्ये वापरण्यात येणारे तेल बदलले तर त्याचा लाभ होऊ शकतो.
आहार कसा असावा?
आरोग्यतज्ज्ञ सांगतात, हृदयरोगाला नियंत्रित ठेवण्यासाठी जेवणामधील चरबीयुक्त अन्नाची मात्रा नियंत्रित ठेवण्यावर लक्ष द्यावे. चरबी म्हणजेच फॅट दोन प्रकारचे असतात. संतृप्त आणि असंतृप्त फॅट. खूप जास्त खारट किंवा खूप जास्त गोड खाद्यपदार्थांमध्ये संतृप्त चरबी असते. तर काजू, बिया आणि ऑलिव्ह तेलामध्ये असंतृप्त चरबी असते. असंतृप्त चरबीयुक्त अन्नपदार्थ सेवन करणे फायदेशीर ठरू शकतात.
ऑलिव्ह तेलाचे सेवन लाभदायी
वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, इतर तेलांच्या तुलनेत ऑलिव्हचे तेल खाण्यामध्ये वापरले तर ते खूपच लाभदायी ठरू शकते. बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासही ऑलिव्हचे तेल महत्त्वाची भूमिका निभावू शकते. जेवणार ऑलिव्हचे तेल सेवन केले तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.
ऑलिव्ह तेलाचे फायदे
आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, ऑलिव्ह तेलात ७५ टक्के मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आढळते. बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड मदत करते. तसेच ऑलिव्ह तेलात अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लामेटरी गुणही आढळतात. हे गुण हृदयाला आरोग्यदायी बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका अदा करतात. कर्करोग आणि स्मृतिभ्रंश यासारख्या आजारांवर ऑलिव्ह तेल परिणामकारक आहे, असे संशोधनात आढळले आहे. हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सलाडमध्ये किंवा अन्नपदार्थ बनविताना ऑलिव्ह तेल वापरले जाते.