वॉशिंग्टन – ‘लवकर निजे, लवकर उठे तयासी आरोग्य, ज्ञान, संपत्ती लाभे, ‘ असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत पहाटे उठण्याचे खूप फायदे सांगितले आहेत. आता तर अमेरिकेत याबाबत झालेल्या संशोधनातून लवकर उठण्याचे अनेक फायदे समोर आले आहेत.
रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे याचे अनेक फायदे आहेत. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे की, जर आपण सकाळी लवकर एक तास जागे झालो, तर नैराश्याचा धोका २३ टक्के कमी केला जाऊ शकतो. सदर संशोधन अभ्यास ‘जामा सायकायट्री’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठ, एमआयटी आणि हार्वर्ड इंस्टिट्यूटच्या संशोधकांनी सुमारे ८ लाख लोकांवर केलेल्या अभ्यासावरून असा निष्कर्ष काढला आहे की, एखाद्या व्यक्तीच्या झोपेच्या वेळेमुळे नैराश्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे या अभ्यासाद्वारे, प्रथमच मानसिक आरोग्यावर झोपेचा किती किंवा कसा बदल होतो ? हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. या कोरोना साथीच्या काळात मानसाच्या नित्यक्रमात बदल झाल्यामुळे या अभ्यासाचे निष्कर्षही फार महत्वाचे ठरू शकतात.
या संशोधनाच्या मुख्य लेखिका, सेलिन व्हेटर म्हणतात की, झोप आणि मनस्थिती यांच्यात संबंध आहे हे आधीपासूनच माहित आहे, परंतु डॉक्टर झोपेतून जागे होण्याबद्दल अनेकांना प्रश्न विचारले आहेत. तेव्हा आम्हाला आढळले आहे की, आपण तासभर लवकर उठतो तेव्हा तर नैराश्याच्या बाबत याचा महत्त्वपूर्ण परिणाम होतो.
संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, जर एखादी व्यक्ती साधारणपणे रात्री एक वाजता झोपत असेल, जर तीच व्यक्ती नंतर पुढील काही महिने रात्री १२ वाजता झोपणार असेल तर नैराश्याचा धोका २३ टक्के कमी होऊ शकतो . तसेच जर तीच व्यक्ती रात्री ११ वाजता झोपली तर हा धोका ४o टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. तथापि, त्या व्यक्तीने लवकरात लवकर सकाळी उठणे देखील आवश्यक आहे.