मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
सध्या देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट सुरू आहे, त्यातच महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चाळीस अंशांच्या आसपास आहे. उन्हामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र बहुतांश घरांमध्ये फ्रीजचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. तर अति थंड पाणी अनेक आजारांना निमंत्रण देते. अशा परिस्थितीत तहान शमवण्यासाठी माठातील थंड पाणी प्यावे, असे पाणी मातीच्या भांड्यातून मिळते. थंड असण्यासोबतच तहानही शमवते. तसेच अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहते. उन्हाळ्यात माठ आणि घागरीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
फ्रीजमधील थंड पाण्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि थंड पाण्याने तहान भागवण्यासाठी मटक्याचा पर्याय निवडू शकता. मातीमध्ये अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्याची क्षमता असते. एवढेच नाही तर यामध्ये असलेले अनेक फायदेशीर खनिजे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासही मदत करतात. म्हणूनच डॉक्टर उन्हाळ्यात मडक्याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात.
उष्णतेच्या वेळी फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम घशासह संपूर्ण शरीरावर होतात. घशातील पेशींचे तापमान अचानक कमी होते. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. घसा खवखवणे, ग्रंथी सुजणे आदी समस्यांना सामोरे जावे लागते.
मातीच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरातील ग्लुकोजची पातळी राखण्यास मदत करतात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो तसेच उष्माघातापासून बचाव होतो.
भांड्यातील पाणी प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून सुटका मिळते. गॅस किंवा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास घागरीच्या पाण्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय, रक्तदाब नियंत्रित करणे, वेदना कमी करणे, अशक्तपणा दूर करणे आणि त्वचा रोग कमी करणे यासाठी देखील हे उपयुक्त आहे.