इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्यस्त जीवनशैलीमुळे, केवळ भारतातच नाही तर जगभरात मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचे टाईप १ आणि टाईप २ असे दोन प्रकार आहेत. या आजारावर वेळीच योग्य उपचार केले नाही तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची लक्षणं ओळखणे गरजेचे आहे.
आजच्या काळात नवनवीन आजार उद्भवत आहेत, तसेच काही जुन्या आजार देखील वाढत आहेत विशेषता मधुमेह रक्तातील साखर ही समस्या भारतातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत. त्यामुळे त्या संदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात उच्च रक्तातील साखरेमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत सकस आहार आणि उत्तम जीवनशैली असणे अत्यंत आवश्यक आहे.
उच्च रक्तातील साखरेच्या रुग्णांनी नाश्ता करतानाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले तर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. रक्तातील साखरेची उच्च पातळी रक्ताभिसरण प्रभावित करू शकते आणि शरीराच्या मज्जातंतूंना नुकसान पोहोचवू शकते. यामुळे टाइप २ मधुमेह असलेल्या , हात आणि पाय दुखणे किंवा मुंग्या येणे, सुन्न होणे अशा समस्या जाणवू शकतात. टाइप २ मधुमेहाची सुरुवात हळूहळू होऊ शकते आणि सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे सौम्य असू शकतात. परिणामी, अनेकांना हा आजार झाल्याचे लक्षात येत नाही. यामुळे तुम्ही वेळीच रक्तातील उच्च साखरेचा धोका टाळू शकता. टाइप २ मधुमेहाच्या आजारामुळे वारंवार तहान लागते. वास्तविक, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास किडनी ते सहज फिल्टर करू शकत नाही आणि शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे वारंवार तहान लागते.
टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांचे वजन झपाट्याने कमी होते. उच्च रक्त शर्करा चरबी साठवण्याच्या मार्गावर परिणाम करते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. टाइप २ मधुमेह रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अत्यंत थकवा, डोकेदुखी, अंधुक दृष्टी आणि जलद हृदयाचे ठोके यांचा समावेश होतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी तपासा. टाईप-२ मधुमेह ही एक समस्या आहे ज्यामध्ये स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करत नाही. या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वयोमानानुसार वाढते. लठ्ठ मुलांना टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता असते. दोन्ही प्रकारचे मधुमेह गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढवू शकतात. किंबहुना, टाइप-१ आणि टाईप-२ या दोन्ही मधुमेहाची लक्षणे सारखीच असतात. त्याची लक्षणे लवकर ओळखून उपचार सुरू केले तर त्याची गुंतागुंतही कमी करता येते.
आजच्या काळात मधुमेह हा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोणाला जर मधुमेह असेल किंवा लठ्ठपणा असेल तर इतर अनेक गंभीर शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. चुकीची जीवनशैली आणि पोषक आहाराचा अभाव यामुळे देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेहाच्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. एका अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, टाइप २ मधुमेह आणि लठ्ठपणा असलेल्या रुग्णांच्या रक्तातील चरबी वाढू शकते, ज्यामुळे त्यांना गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. यूकेच्या लीड्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात एक अभ्यास केला आहे. शरीरात उपस्थित असलेल्या रक्तातील चरबीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे, स्नायूंच्या पेशींची रचना बदलू शकते.
मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या रुग्णांनी त्यांच्या रक्तातील चरबीच्या पातळीचे निरीक्षण करावे आणि ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून रक्तातील चरबीमुळे शरीराला गंभीर नुकसान होणार नाही, असा सल्ला या अभ्यासात देण्यात आला आहे. रक्तातील चरबीबद्दल आणि मधुमेह आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवरील याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाचे दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार १ मधुमेह आणि दुसरा प्रकार २ मधुमेह. जे रुग्ण टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण आहेत, त्यांच्या शरीराला रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले की गंभीर नुकसान होऊ लागते. रक्तातील चरबीला ट्रायग्लिसराइड्स म्हणतात. रक्तातील चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील सिग्नल पेशी नष्ट होतात आणि रुग्णाची प्रकृती बिघडू लागते.
मधुमेहाशिवाय लठ्ठपणाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही रक्तातील चरबी वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. रक्तातील चरबी वाढल्यामुळे ऊतींचे नुकसान होऊ शकते आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांवर परिणाम होतो. लठ्ठपणामध्ये रक्तातील चरबी वाढल्याने हृदय व रक्तवाहिन्या संबंधी रोगाचा धोका वाढू शकतो. मधुमेही आणि लठ्ठ रुग्णांमध्ये रक्तातील चरबी वाढणे धोकादायक मानले जाते. अशा परिस्थितीत रक्तातील चरबीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी नियमित सकस आहार घ्यावा, रक्तातील चरबी वाढण्याचे कारण म्हणजे मधुमेह आणि चुकीचा आहार होय. अशा रुग्णांची वेळोवेळी तपासणी करावी. रक्तातील चरबीची वाढ रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी साखरेचे सेवन कमी केले पाहिजे. तसेच दारू आणि धूम्रपान टाळणे आवश्यक आहे.
रक्त किंवा लघवीमधील जास्त साखरेमुळे संसर्ग होऊ शकतो. यीस्टचा संसर्ग त्वचेच्या उबदार, ओलसर भागांवर होतो, जसे की तोंड, जननेंद्रियाचे भाग, इत्यादी. रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी वारंवार लघवी करणे आवश्यक असते, परंतु यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. यामुळे निर्जलीकरण होऊन व्यक्तीला नेहमीपेक्षा जास्त तहान लागते. मधुमेहामुळे अन्नातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही. पाचक प्रणाली अन्नाचे ग्लुकोजमध्ये खंडन करते. याचा वापर शरीर इंधन म्हणून करते. मधुमेह असलेल्यामध्ये, हे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाहातून शरीराच्या पेशींमध्ये जात नाही. परिणामी, टाइप २ मधुमेह असलेल्याना अनेकदा भूक लागते. टाईप २ मधुमेह व्यक्तीच्या उर्जेच्या पातळीवर परिणाम करू शकतो आणि त्यामुळे त्यांना खूप थकवा जाणवू शकतो.
रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, तेव्हा मूत्रपिंड रक्तातील अतिरिक्त साखर फिल्टर करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे व्यक्तीला जास्त वेळा लघवी करण्याची गरज भासू शकते. विशेषतः रात्री मोठ्याप्रमाणावर लघवी होते. तसेच रक्तातील अतिरिक्त साखरेमुळे डोळ्यातील लहान रक्तवाहिन्या खराब होतात, ज्यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते. मधुमेहाने ग्रस्त व्यक्तीना रक्तवाहिन्यांचे अधिक गंभीर नुकसान होऊ शकते, म्हणून काळजी घ्यावी.
Health Tips Diabetes Symptoms Precaution