पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय आहार पद्धतीमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो, त्याचप्रमाणे मसाल्याच्या पदार्थांमधील धने, जिरे, मोहरी यांचा देखील चांगला उपयोग करण्यात येतो. शेतात धने लावल्यावर त्यापासून कोथंबीर तयार होते. कोथिंबीर ही कोणत्याही भाजीमध्ये वापरतात. कोथिंबीर आणि धने सामान्यतः सर्वच स्वयंपाकघरात वापरली जातात. निरोगी राहण्यासाठी दररोज धन्याचे पाणी पिणे खुपच फायदेशीर आहे. धने खाण्याचा एक चांगला पर्याय म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरचे पाणी पिणे होय. याचे अनेक फायदे आहेत.
धन्याचे पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. पचनाच्या समस्या दूर करण्याचे काम करते. हे पाणी रोज सेवन केल्याने शरीरातील पचनशक्ती नियंत्रित राहते. त्यामुळे पोटात अॅसिडिटीची पातळी वाढत नाही. तसेच पोटदुखी, जळजळ, गॅस यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. वजन कमी करायचे असेल तर धन्याच्या पाण्याचा आहारात समावेश करावा. कारण धन्याच्या पाण्यात चयापचय प्रक्रिया गतिमान करणारे घटक असतात. यामुळे शरीरात साठलेली चरबी कमी होऊ लागते आणि वजन झपाट्याने कमी होऊ लागते.
थायरॉईडच्या रुग्णांनीही दररोज सकाळी रिकाम्या पोटी धन्याचे पाणी प्यावे. थायरॉईडची कमतरता किंवा जास्ती दोन्हीमध्ये हे फायदेशीर आहे. कारण धने मध्ये आढळणारी खनिजे आणि जीवनसत्त्वे थायरॉईड संप्रेरकांचे नियमन करण्यास मदत करतात. हे पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात, त्यामुळे अनेक आजारांशी लढण्यास मदत होते.