इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कॉफी हे स्टेटसचं प्रतिक आहे. म्हणजे गर्लफ्रेंडसोबत वेळ घालविण्यासाठी वन-बाय-टू कॉफी घेतली जाते. मोठमोठ्या उद्योजकांच्या भेटीमध्ये कॉफीच असते. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कॉफीचे आऊटलेट्स नव्या तरुणांना वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीकडे आकर्षित करताना दिसतात. पण प्रत्येकवेळी डायट कॉन्शस लोकांना टेंशन असतं ते कॉफीमुळे वाढणाऱ्या वजनाचं. मात्र आज आपण अश्या एका कॉफीबद्दल जाणून घेणार आहोत, जी वेटलॉससाठी ओळखली जाते.
वजन कमी करायचं आहे म्हटल्यावर त्याचे असंख्य उपाय आजमावले जातात. अगदी कडधान्य खाण्यापासून तर एकवेळच जेवण करण्यापर्यंत अनेक उपाय केले जातात. पण वजन कमी करण्यासाठी एक साधी कॉफी पुरेशी आहे, हे ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नसला तरीही ते खरे आहे. ही कॉफी तयार करण्यासाठी अवघी पाच मिनीटं लागतात. एक चमचा कॉफी, एक चमला लिंबाचा रस, 2 कप पाणी, एक चमचा मध आणि 1 दालचिनी एवढच साहित्य याला लागतं.
अशी करा कॉफी
दोन कप पाणी चांगलं उकळून घ्या. त्यात एक दालचिनी टाका. त्यानंतर आणखी काही वेळ उकळू द्या. पुढे दोन चमचे कॉफी टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत उकळू द्या. त्यानंतर एक चमचा मध आणि एक अर्ध्या लिंबाचा रस टाकून थेट कॉफी प्यायला घ्या.
तर कॅन्सर होऊ शकतो
अति कॉफी घेतल्यानं कॅन्सरचा धोका संभवतो, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. जास्त गरम कॉफी पिल्याने तर हा धोका अधिक वाढतो, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. पण मर्यादित स्वरुपात कॉफीचं सेवन केल्यास त्याचा काहीच धोका नाही.
कॉफी तर प्रेमाचं प्रतिक
प्रियकर प्रेयसी यांना भेटायचं असेल तर कॉफीचं निमित्त असतं. पूर्वीच्या काळात सोय नव्हती म्हणून, पण आज मित्र मैत्रीणी, प्रियकर प्रेयसी एकत्र भेटले की कॉफीच हवी असते. त्यातही काही कंपन्यांनी टाकलेले आऊटलेट्स जगातील दर्जेदार कॉफी सर्व्ह करीत असल्यामुळे त्याकडे अधिकच ओढा असतो.
Health Tips Coffee Weight Loss Drink