मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आता उन्हाळा जाणवू लागला असून गेल्या काही दिवसांपासून वातावरण उष्ण होत आहे, मात्र रात्री पुन्हा वातावरणात थंडावा येत आहे. सध्या या हवामानातील या बदलामुळे अनेक जण सहज आजारी पडू लागतात. कोरोना विषाणूच्या या महामारीच्या काळात आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. अशा परिस्थितीत आपण आहारात आवश्यक पोषक घटकांचा समावेश केला पाहिजे. विशेषतः चिकू सारखी फळे आहारात घ्यावीत, हिवाळ्यात येणारे चिकू हे गोड आणि रुचकर फळ देखील अनेक आरोग्य फायद्यांनी परिपूर्ण आहे.
सीझनमध्ये रोज हे खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. चिकू हे फळ गरोदरपणात खूप फायदेशीर ठरते. याशिवाय वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. चला जाणून घेऊया चिकूचे फायदे:
जर सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्यावर चिकू रामबाण उपायापेक्षा कमी नाही. जुना खोकला देखील यामुळे बरा होतो.
चिकूमध्ये अनेक अँटी-व्हायरल, अँटी-परजीवी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, ते बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करू देत नाहीत.
अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर चिकूचा वापर नक्की करा. यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता दूर करते, इतर संक्रमणांशी लढण्याची शक्ती देते.
चिकू फळाच्या बिया बारीक करून खाल्ल्याने मूत्रासोबतच मुतखडा निघून जातो. याशिवाय किडनीच्या अन्य आजारां पासूनही संरक्षण मिळते.
चिकू तुमचे मन शांत ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास खूप मदत करते.
जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायची असतील तर चिकू नक्की खा. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह भरपूर प्रमाणात असते, जे हाडांसाठी खूप महत्वाचे असतात.