शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आरोग्य टीप्सः काजू आहे अनेक विकारांवर गुणकारी; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे

सप्टेंबर 9, 2022 | 5:15 am
in राज्य
0
Cashew e1662644410725

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतात मुख्यत्वे महाराष्ट्रातील कोकणात काजूचे पीक घेतले जाते. त्यामुळे कोकणात गेल्यानंतर अगदी खरेदी करण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘काजू’ काजूची नुसती चवच चांगली नाही तर काजू हा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. सुक्या मेव्यामधील राजा अशा ज्याची ओळख आहे तो म्हणजे ‘काजूगर’ होय.

काजूचा गर तोंडात टाकला की, साक्षात मधाळ गर खाल्ल्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. पुलाव, बिर्याणी, चिकन, गोडाचे पदार्थ या सगळ्यांमध्ये काजूचा गर वापरला जातो. काजू हा अगदी कोणत्याही डिशमध्ये परफेक्ट फिट होणारा असा प्रकार आहे. त्यामुळे काजू हा प्रत्येक घरात असतो. जेवणात नाही तर तुम्ही सहजही कधीही काही काजूचे गर तोंडात टाकू शकता. पण काजू खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया काजू घेण्याचे फायदे

काजू हे फळ उष्ण कटीबंधीय प्रदेशात होते. काजूची झाडे ही बुटकी पण डेरेदार असतात. त्याला सफरचंदाच्या आकाराची फळ लागतात. त्याच्या खाली असलेला गर हा काजूगर असतो. त्याचे फळ हे मीठ-मसाला लावून खाल्ले जाते. तर काजूच्या बिया वाळवून त्या भाजल्या जातात. त्यानंतर त्याचा पांढरा गर मिळतो. हल्ली काजूचे अनेक प्रकार बाजारात मिळतात. ३ ) सालंवाले काजू हे कोकणात हमखास मिळतात. पण काजू सोलण्याचे कष्ट नको म्हणून सोललेले काजू याशिवाय वेगवेगळ्या फ्लेवरमध्येही काजू मिळतात. काजूमधील पोषकत्वे जाणून घेतल्यानंतर आता जाणून घेऊया काजू खाण्याचे नेमके फायदे काय आहेत ते. त्यानुसार तुम्ही आहारात काजूचे सेवन करु शकता.

फॅट हे शरीरासाठी चांगले नसले तरी काही फॅट हे शरीरासाठी चांगले असतात. काजूमध्ये ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे फॅट असतात. त्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत मिळते. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असते. फॅटमुळे शरीरासाठी खराब असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे ह्रदयविकाराच्या आजारापासून तुम्ही दूर राहता. पण यासाठी काजूचे सेवनही योग्य प्रमाणात होणे गरजेचे असते. कारण काजूच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते.काजूप्रमाणेच खारीक खाण्याचे फायदे ही आरोग्यासाठी फारच लाभदायक असतात.

काजू खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले फॅट मिळ्ण्यास मदत मिळते. पण वजन नियंत्रणात ठेवण्याचे मुख्य कारण म्हजणे काजू हा फायबरचा साठा आहे. फायबरयुक्त पदार्थ हे शरीरासाठी फारच चांगले असतात. काजूच्या सेवनामुळे पोट भरते. काजूमध्ये असलेले मॅग्नेशीअम पचनशक्ती वाढवते. यामध्ये असलेली कार्बोदके वजन कमी करण्यास मदत मिळते. याशिवाय काजूमध्ये प्रोटीन असतात. ज्यामुळेही शरीराला आवश्यक घटक मिळून वजन नियंत्रणात राहते.

काजूमध्ये झिंक, आर्यन, फॉस्फरस खच्चून भरलेले असते. यासोबतच काजूमध्ये प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात. जे त्वचा आणि केसांच्या वाढींना चालना देण्याचे काम करतात. काजूचे गर आणि काजूचे तेल या दोन्हीच्या वापरामुळे केस आणि त्वचेला फायदे मिळतात. काजूमुळे मेलनिनची उत्पत्ती होण्यास मदत मिळते. काजूच्या सेवनामुळे किंवा त्याच्या वापरामुळे केस मऊ आणि मुलायम होतात.

काजूमध्ये योग्य प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असते. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करते. काजूच्या सेवनामुळे बुद्धी तल्लख होते. गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते. काजूमध्ये काही प्रमाणात कॉपर देखील असते. जे शरीरात उर्जेची निर्मिती, मेंदूचे सुरळीत कार्य आणि प्रतिकारशक्ती वाढवते. एकूणच शरीराचे कार्य उत्तम ठेवण्यासाठी काजू कार्य करते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगासने ही फायद्याची ठरतात.

काजूमध्ये ओमेगा ३ नावाचे फॅटी अॅसिड असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन E हे देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. डोळ्यांना इतर त्रासापासून दूर ठेवण्याचे कामही काजूगर करतात. त्यामुळे चांगल्या डोळ्यांसाठी काजू गराचे सेवन करावे. डोकेदुखीशी निगडीत असा आजार म्हणजे मायग्रेन होय. मायग्रेनची डोकेदुखी ही असह्य असते.मायग्रे नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याचा त्रास कमी करण्यासाठी काजू खाण्याचा सल्ला दिला जातो. काजूमध्ये असलेले मॅग्नीझ नावाचे घटक डोकेदुखीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांना कमी करुन मायग्रेनचा त्रास कमी करण्यास मदत करते.

काजू रक्तामधील नसांना मोकळे करण्याचे काम करते ज्यामुळे मायग्रेनचे अटॅक आपोआप कमी होऊ लागतात. काजूमध्ये सेलिनिअम नावाचे द्रव्य असते जे थायरॉईडचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करते. शरीरातील थायरॉईडची पातळी योग्य करुन त्याचे कार्य सुरळीत चालण्यास ते मदत असल्यामुळे काजू हे फारच फायदेशीर आहे.

महिलांना थायरॉईडचा त्रास आणि लक्षणे हा अधिक असतो. त्यांच्या थायरॉईड टिश्यूंना रिलॅक्स करण्याचे काम काजू करते. त्यामुळे काजूचे सेवन हे थायरॉईडसाठी फायदेशीर ठरते. जर तुम्हाला थायरॉईड असेल योग्य सल्ला घेऊन तुम्ही काजूचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही. काजूमध्ये असलेले मॅग्नेशीअम हे हाडांसाठी फारच महत्वाचे असते.

Health Tips Cashew Nutrition Food Disease Benefits

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई महापालिका निवडणूकः शिंदे गटासाठी भाजपची अशी आहे रणनिती

Next Post

आयकर विभागाच्या रडावर आता थेट छोटे राजकीय पक्ष; अनेक ठिकाणी धाडी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
income tax pune e1611467930671

आयकर विभागाच्या रडावर आता थेट छोटे राजकीय पक्ष; अनेक ठिकाणी धाडी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011