विशेष प्रतिनिधी, पुणे
आरोग्यासाठी कोणतेही फळ हे गुणकारी समजले जाते. त्यातही काही फळांचे महत्त्व अधिक असते. विशेषत : सफरचंद, ,जांभूळ, संत्री, मोसंबी आदि फळे अत्यंत महत्त्वाचे असून त्यातही जांभूळ मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, परंतु त्याचे इतर लाभ देखील जाणून घेऊ या…
१) सहसा उन्हाळ्याच्या काळात छातीत जळजळ होते, तेव्हा जांभूळ खाल्ल्याने आराम मिळतो. फक्त फळच नाही तर त्याची पाने देखील फायदेशीर असतात. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी ते उपयुक्त असून पचन ठीक होते.
२) डायटिशियन डॉ. श्रेया मिधा सांगतात की, जांभूळ खाल्ल्यावर त्याच्या बियांपासून आपण अर्धा चमचा पावडर तयार केली असेल तर ती फेस पॅक म्हणून लावू शकता. तसेच जांभूळ फळाला रूग्णा आहार म्हणून दिले जातो, कारण त्याने अनेक आजारांना टाळता येते.
३) जांभूळ आपली प्रतिकारशक्ती वाढवते. त्याच्या बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे देखील असतात. अँटिऑक्सिडेंट असल्याने ते हानिकारक मुक्त रेडिकल शरीरापासून दूर ठेवतात. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.
४) कोरोना संक्रमणामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची सर्वात जास्त फळांची गरज आहे. जांबूळ अँटीऑक्सिडेंट असल्याने ते रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते. तसेच त्यात फायबर असून पोट सुरक्षित ठेवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

५) विविध नावे : जांभुळ या वनस्पतिचे इंग्रजी नाव सिझिझियम कमिना आहे. मायर्टसी गटातील या फळाला संस्कृतमध्ये महाफळ किंवा महाजंबू, आसामीमधील जमु, बंगालीमध्ये कलाजम, गुजरातमधील जांभू, महाराष्ट्रातील जांभूळ असे म्हणतात.
६) हे आहेत घटक : ऊर्जा – ६२ कॅलरीज, व्हिटॅमिन – सी १८ मिलीग्राम, कॅल्शियम – १५ मिलीग्राम, फॉस्फरस – १५ मिलीग्राम, पोटॅशियम – ५५ मिलीग्राम, मॅग्नेशियम – ५ मिलीग्राम
७) तोंडावरील मुरुम कमी करायचा असेल तर जांभूळचा रस वापरा. जांभूळ बीया आणि पानांचा रस हरभरा पिठामध्ये मिसळा आणि त्वचेवर लावा. त्यामुळे त्वचेवर तेलकटपणा कमी होतो. त्याच्या गुणधर्मांमुळे त्वचेच्या विकारांमध्ये ते फायदेशीर ठरते.
८) रामबाण औषध : जांभूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध असून आहारतज्ज्ञ उन्हाळ्याच्या हंगामात जांभूळ खाण्याची शिफारस करतात. जांभूळपासून वेगवेगळ्या प्रकारची औषधे तयार केली जातात.
९) असा देखील फायदा :
– कानातून पू किंवा जखम असल्यास जांबूळाच्या बिया पिळून घ्या. त्यात मध मिसळा. कानात दोन थेंब टाका, कान दुखणे दूर होईल.
– जांभळच्या पानांची राख दात आणि हिरड्या वर चोळा, त्यामुळे दातांची शक्ती वाढते, दुखणे बरे होते.
– तोंडात फोड असल्यास त्याच्या पानांच्या रसाने गुळण्या केल्यास आराम मिळेल.
– जांभूळ फळांचा रस वीस मिलीलीटर घेतल्यास घश्याचे आजार बरे होतात.









