नागपूर (इंडिया दर्पण वृतसेवा) – डोक्यावरचे केस ही प्रत्येकालाच अभिमान किंवा शान वाटणारी बाब असते. विशेषतः तरुण तरुणींना आपले केस मुलायम काळे आणि घनदाट असावेत, असे वाटते. परंतु सध्याच्या काळात केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरूणांचे देखील केस पांढरे होणे व केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. इतकेच नव्हे तर महिलांची केस देखील मोठ्या प्रमाणावर गळतात. या समस्यांनी अनेक जण त्रस्त असून त्यावर नेमका काय उपाय करावा ? याची प्रत्येकालाच चिंता असते. आजच्या अशी कोणतीही व्यक्ती नाही जी त्वचा किंवा केसांची समस्या जाणवत नाही. धकाधकीच्या या धावपळीच्या जीवनात वेळ काढणे आपल्यासाठी किती कठीण झाले आहे.
सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, धूळ, धूर, सतत वाढत जाणारे आजार आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा आणि केस वेळेपूर्वीच खराब होऊ लागतात. आजकाल लहान मुलांना पांढऱ्या केसांची समस्या भेडसावत आहे. असा प्रकार व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे होतो. पांढऱ्या केसांपासून सुटका करण्यासाठी तुळशी आणि आवळ्याचा वापर करावा, हा हेअर मास्क किंवा लेप बनवण्यासाठी आवळा पावडर आणि तुळशी पावडर कोमट पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. यानंतर आठवड्यातून दोनदा ही पेस्ट केसांना लावावी. या मास्कमुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होईल. पांढरे केस लपविण्यासाठी लोक हेअर डाईचा वापर करतात, परंतु हा केमिकल युक्त रंग तुमच्या केसांना आणखी नुकसान पोहोचवू शकतो. केस झपाट्याने गळू लागतात. त्यामुळे केस रंगवण्याऐवजी घरगुती उपाय वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
– पांढरे केस नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी रेठा हा रामबाण उपाय मानला जातो. आवळा आणि रेठाची पावडर लोखंडी कढईत किंवा कोणत्याही भांड्यात रात्रभर भिजवून ठेवा, नंतर सकाळी केसांना, विशेषतः पांढर्या केसांवर चांगले लावा. कोरडे झाल्यानंतर धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा असे केल्याने लवकर फायदा होईल.
– पांढरे केस काळे करण्यासाठी कांदा खूप गुणकारी आहे. कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावा, नंतर कोरडे झाल्यावर केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा कांद्याचा रस वापरा.
– पांढरे केस काळे करण्यासाठीही मेथीचा वापर करता येतो. मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, नंतर दुसऱ्या दिवशी बारीक करून पेस्ट बनवा. आता केसांच्या मुळांवर लावा आणि कोरडे होऊ द्या. ते कोरडे झाल्यावर आपले डोके शैम्पूने धुवा. तसेच मेथी खोबरेल आणि एरंडेल तेलात मिसळून शिजवा. त्यानंतर डोक्याला मसाज करा. असे सतत करत राहा, केस पांढरे होण्यापासून लवकरच सुटका होईल.
– कोरफडीमुळे त्वचा तर चमकदार तर होतेच पण त्याचबरोबर केसांनाही चमक मिळते. तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा कोरफडीच्या जेलने स्कॅल्पला थोडा वेळ मसाज करा. ते सुकल्यावर शैम्पूने धुवा आणि कंडिशनर लावू नका. कोरफडीचे जेल आठवड्यातून 2-3 वेळा वापरा. कोरफडीमुळे केस काळे होण्यासोबतच केस मजबूत आणि चमकदार होतात.