इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपले जीवन आरोग्यदायी राहण्यासाठी वेगवेगळ्या फळांचे सेवन करणे आवश्यक असते. त्यातच काही फळे आपण नेहमी खात नाहीत, किंवा कधीच खाललेले नसते. त्यापैकीच एक म्हणजे बेरी होय, त्याचे चांगले आणि आरोग्यदायी फायदे मिळतात. विशेषतः ब्लू बेरी, रास्पबेरी, क्रॅनबेरी यांसारख्या विविध प्रकारच्या बेरी चवीला अप्रतिम व आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या बेरीचे सेवन शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक घटकांची पूर्तता करते, ज्यामुळे हृदयापासून मूत्रपिंड, पोटापर्यंत प्रत्येक अवयव योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम असतो. बेरीमध्ये विरघळणारे फायबर असल्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते, लवकर भूक लागत नाही, त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात राहतो. चला जाणून घेऊ या वेगवेगळ्या बेरीचे आरोग्यदायी फायदे.
रास्पबेरी :
अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी फायटोन्यूट्रिएंट्स आणि फायबर समृद्ध असलेल्या रास्पबेरीचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे. संशोधनानुसार या रसाळ फळाच्या सेवनाने टाइप-2 मधुमेह आणि लठ्ठपणाची समस्या सहज कमी होऊ शकते. आणि काळ्या रास्पबेरीच्या सेवनाने, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो.
क्रॅनबेरी :
क्रॅनबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रक्षोभक आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि पचनाच्या समस्यांचा त्रास होत नाही. कॅन्सर, अल्सर आणि सेल डॅमेजमुळे होणाऱ्या आजारांचा धोकाही क्रॅनबेरीच्या मदतीने दूर ठेवला जाऊ शकतो.
ब्लू बेरी :
ब्लूबेरीमध्ये भरपूर पोटॅशियम, फोलेट, फायबर आणि व्हिटॅमिन सी असतात, जे शरीराची अनेक कार्ये राखण्यासाठी आवश्यक असतात. तसेच ब्लूबेरी खाल्ल्याने स्मरणशक्ती कमी होत नाही कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. ब्लूबेरी इंसुलिन संवेदनशीलता सुधारतात, आणि टाइप 2 मधुमेहाची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.