मुंबई – चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी लोक काय काय प्रयोग करतात. या प्रयोगांमध्ये केवळ महिलाच नव्हे तर पुरुषही आघाडीवर आहेत. कॉस्मेटिक क्रीम्सच्या जाहिरातींमध्ये भलेही महिलांचे चेहरे दाखविले जात असले तरीही पुरुष मागे नाहीत. स्त्री असो वा पुरुष चेहऱ्यावरील ग्लो येण्यासाठी कितीही प्रयोग केले तरीही नैसर्गिक ग्लो दिसत नाही. मात्र दुधात मध मिक्स करून प्यायल्यास चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो.
ग्लोईंग स्कीनसाठी होणारी धडपड फार केवीलवाणी असते. त्यासाठी प्रयोग करण्यामागचा कॉन्फिडन्स तर कमालीचा असतो. पण तरीही यश का येत नाही, याचा विचार फार कमी लोक करतात. मात्र दुधात मध मिसळून दररोज पिऊन बघा, फायदा झालाच समजा.
वजनावर नियंत्रण
हल्ली स्थुलपणा ही सर्वांत मोठी समस्या होऊन बसली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. मात्र त्यावरही हाच रामबाण उपाय आहे. दररोज दुधात सहद मिक्स करून प्यायल्यास वजन नियंत्रणात येऊ शकते. मधामध्ये अँटीआक्सीडंट गुण असून ते शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
तणावापासून मुक्ती
गरम दुधासोबत सहद घेतल्यास तणाव नियंत्रीत केला जाऊ शकतो. मध हे स्नायूंसाठी तर लाभदायक आहेच, पण डोके शांत ठेवण्यासाठीही मदत करते.
रोगप्रतिकारशक्ती
दूध आणि सहद यांचे कॉम्बिनेशन शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविते. दुधात असलेले प्रोटीन कॅल्शीयम आणि मधात असलेले रोगविरोधी गुण मिळून शरीरातील आजार दूर करतात.
सुरकुत्या कमी होतात
अनेक सौंदर्यतज्ज्ञ सांगतात की दूध आणि मधाचा फेस मास्क चेहऱ्यावरील घाण दूर करतो. या मास्कच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होऊ शकतात.