इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात मद्यपान करणे ही जणू काही फॅशन झाली आहे, परंतु मद्यपानाचे अनेक तोटे असतात, हे सर्वांना माहीत आहे तरी बहुतांश जण मद्यपान करतात. त्यामध्ये देशी-विदेशी दारू, बियर, वाईन यांचा समावेश असतो. त्यापैकी वाइनही दारू नसून ते एक सॉफ्टड्रिंक आहे, असे सांगण्यात येते. परंतु बियर पिण्याचे देखील तोटे आहेत तरी काही जण त्याचे फायदे सांगतात, नेमके काय आहे हे जाणून घेऊ या
बिअर हे एक प्रसिद्ध पेय आहे, त्यामध्ये 5 ते 12 टक्के अल्कोहोल असते, ज्यामुळे ते कमी हानिकारक मानले जाते. बिअर जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा स्रोत आहे आणि काहींमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात.
एका अहवालांवर विश्वास ठेवला तर, ते पिण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करणे, वेदना कमी करणे इ. बरेच जण ते फायदेशीर मानतात आणि ते दररोज पितात, परंतु आपण अशा व्यक्तींपैकी असाल तर त्याचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.
सुरुवातीच्या अभ्यासात असे सूचित होते की, मध्यम प्रमाणात बिअर पुरुष आणि रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांसाठी हाडे मजबूत करण्यास मदत करू शकते. तथापि, जास्त मद्यपान केल्याने त्याचे नुकसान होऊ शकते. या प्रकरणात योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.
असे बरेच जण आहेत जे कधी कधी बिअर पितात पण जेव्हा ते पितात तेव्हा ते मर्यादेपेक्षा जास्त पितात. जर आपण रोजचे मद्यपान करणाऱ्यांपैकी एक असाल तर त्याचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा हे फायदे सुद्धा तोट्यात बदलू शकतात.
बर्याच बिअरमध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लक्षणीय वजन वाढू शकते. बर्याचदा रोज बीअर पिणाऱ्या लोकांचे पोट जास्त वाढलेले पाहिले असेल, या प्रकाराला ‘बीअर बेली’ म्हणता येईल. अभ्यासानुसार, बिअर प्यायल्याने कंबर जास्त वाढते. त्याच वेळी, अशी चरबी कमी करणे खूप कठीण आहे.
जर दिवसातून दोनपेक्षा जास्त बिअर पीत असाल तर आपल्याला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते किंवा सिरोसिस होण्याची शक्यताही वाढते.
आजकाल बहुतेक जण झोपेच्या समस्यांशी झुंजत आहेत. जर झोप येण्यास त्रास होत असेल तर बिअरपासून दूर राहा. बिअर झोपेच्या चक्रात अडथळा आणू शकते.
एखाद्याने ते मर्यादेपेक्षा जास्त पिणे टाळले पाहिजे, परंतु जर हृदय, यकृताशी संबंधित समस्या असतील किंवा महिला गर्भवती असाले किंवा कोणत्याही प्रकारची औषधे घेत असाल तर बीअर पिऊ नका.