मुंबई – आजच्या काळात सर्वांचेच आयुष्य ताणतणावाचे बनले असून अत्यंत धावपळीच्या कामामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. परंतु स्वतःचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा कामावर निश्चितच चांगला परिणाम होतो. त्यासाठी प्रत्येकाने आरोग्य विषयक काही टिप्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
दिवसभर काम केल्यानंतर ऊर्जा कमी होते. विशेषतः आपण ऑफिसला जात असाल किंवा घरून काम करत असाल तर आपल्याकडे स्वतःसाठी वेळ राहत नाही. अशा स्थितीत कधी-कधी असे वाटते की, ऑफिसशिवाय आपले काही आयुष्य किंवा जीवनच नाही. अशा परिस्थितीत सायंकाळी ६ वाजल्यानंतर स्वत:ला वेळ देऊन काही गोष्टी केल्या पाहिजेत. कोणत्या त्या जाणून घेऊ या…
वाचन
काहीही लिहिण्यासाठी वाचन खूप महत्वाचे आहे, त्यामुळे जर तुम्ही पुस्तक लिहिण्याचा विचार करत असाल तर जरूर वाचा. तसेच त्यामुळे वाचनाने मन शांत राहते. रोज संध्याकाळी, स्वतःसाठी वेळ काढा आणि काहीतरी लिहा. अगदी तुम्हाला जे वाटत असेल ते कागदावर लिहा.
व्यायाम
तुम्हाला सकाळी व्यायाम किंवा वर्कआउट करण्याची संधी मिळाली नाही तर तुम्ही संध्याकाळी ६ वाजता वर्कआउट करू शकता. यामुळे तुमची झोपही चांगली होईल.
कुटुंबासाठी वेळ
कितीही व्यस्त असलात तरी मित्र आणि कुटुंबासाठी वेळ काढा. मानसिक आरोग्यासाठी कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालविणे चांगले ठरते.
छंद जोपासा
आजकाल नोकरदार वर्ग डोळ्यासमोर ठेवून संध्याकाळी अनेक क्लासेस घेतले जातात. त्यामुळे निसर्गोपचार, योग किंवा कोणताही छंद वर्ग यात सहभागी व्हावे.
नृत्य
नृत्य हा सर्वोत्तम व्यायाम आहे, त्यामुळे शरीर व मनाला हलके वाटते. त्यामुळे सक्रिय राहण्यासाठी मुक्तपणे नृत्य करा.