इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आरोग्यासाठी आपल्याला नेहमी चालण्याचा सल्ला दिला जात असतो. दररोज किमान अर्धा ते एक तास चालण्यामुळे त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात. तसेच कर्करोगासारख्या अनेक असाध्य रोगांपासूनही आपला बचाव होत असतो. त्यामुळे सकाळ- सायंकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालले पाहिजे. त्याच बरोबर अनेकांकडून आपल्याला अनवाणी चालण्याचाही सल्ला दिला जात असतो. अनवाणी चालण्यामुळे डोळ्यांपासून ते अगदी ह्रदयापर्यंत त्याचे फायदे आहेत.
जुने जाणते नागरिक आपणास अनेकदा अनवाणी चालताना दिसतात. त्याबद्दल त्यांच्याकडून अनेक फायदे सांगण्यात येत असतात. धावपळीच्या जीवनात आपण सर्वजण पूर्णपणे व्यस्त झालो आहोत. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आपल्याला सर्वात जास्त निसर्ग उपचाराची गरज आहे. निसर्गोपचार हे निसर्गाच्या अनेक गुणधर्मांनी उपचार करते. आजकाल आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत, आपण पृथ्वीच्या इलेक्ट्रॉन्सच्या संपर्कात आल्यावर त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, त्याचाच एक भाग म्हणजे अनवाणी चालणे, त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
गवतावर अनवाणी चालणे खूप फायदेशीर असते, असे अनेक जण सांगतात. असे केल्याने दृष्टी अधिक तेजस्वी होते. अनवाणी चालण्याने आपल्या पायाच्या तळव्यावरील दाब बिंदू पूर्णपणे सक्रिय होतात. रिफ्लेक्सोलॉजी सायन्सच्या अहवालानुसार, जेव्हा आपण असे चालतो तेव्हा आपल्या पायांचा सर्वात जास्त दबाव बोटांवर पडतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांमध्ये जास्तीत जास्त मज्जातंतूचा शेवट असतो, जो दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तदाबाची समस्याही दूर होते.
विशेषतः उद्यानात किंवा कुठेही गवतावर अनवाणी चालण्याने मानसिक शांतता मिळत असते. मानसिक आरोग्यासाठी अशा प्रकारे चालणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक वयस्क मंडळी सायंकाळी गवतावर अनवाणी चालताना दिसतात. एका अभ्यासानुसार, जेव्हा आपण जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. ह्रदयाचे ठोके हे हार्मोन्सपासून ते शरीराच्या तापमानापर्यंत अनेक गोष्टींचे नियमन करत असते त्यामुळे त्याचे संतुलन अत्यंत महत्वाचे मानले जाते.
सकाळी उगवत्या सूर्यासोबत गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालत असाल, तर सूर्यापासून व्हिटॅमिन डी देखील मिळतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करते, या शिवाय अनवाणी चालण्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहत असते. घरात अनवाणी चालण्याची सवय असेल तर त्याचे अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. दिवसभरात थोडा वेळ अनवाणी चालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जेव्हा आपण अनवाणी चालतो तेव्हा आपल्या पायाची त्वचा थेट पृथ्वीशी जोडली जाते. ज्याचा आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो.
अनवाणी चालण्याने अॅक्युपंक्चर खूप सक्रिय होते. ज्यामुळे संपूर्ण शरीरदेखील सक्रिय होते. मात्र या सगळ्यामध्ये अनवाणी चालण्याचे अनेक दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. यातील मोठ्या गोष्टी जाणून घ्या.अनवाणी चालणे तुम्हाला निसर्गाशी जोडते. तसेच असे केल्याने शरीराची सूज कमी होऊ शकते. अनवाणी चालण्याने हृदय नेहमी निरोगी राहते. अनवाणी चालण्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होऊ शकते. असे केल्याने तणाव दूर होऊ शकतो.
रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. अनवाणी चालण्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. अनवाणी चालणे दीर्घकालीन वेदना बऱ्या करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अनवाणी चालल्याने झोपेची समस्या कमी होते. दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठीदेखील अनवाणी चालणे चांगले असू शकते.
अनवाणी चालल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. अनवाणी चालण्याने हुकवर्मचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. कारण या किड्याचा लार्वा पायाच्या त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो. स्विमिंग पूल, लॉकर रूम, जिम आणि बीच यांसारख्या ठिकाणी अनवाणी चालणे टाळावे.
Health Tips Barefoot Walking Benefits and Disadvantages