नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजकाल जगभरात मधुमेहाच्या समस्येने सर्वांनाच ग्रासले आहे. याला कारण म्हणजे आजच्या काळात अयोग्य आहार, ताणतणावपूर्ण जीवनशैली आणि आळशीपणा यामुळे अनेक जण लठ्ठपणाचे बळी ठरतात. मानसिक ताण, शारीरिक श्रम आणि बदलती जीवनशैली हे मधुमेहाचे प्रमुख कारण मानले गेले आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की माणसाने आपल्या जीवनशैलीसोबतच रोजच्या जेवणाचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.
एका आरोग्य अहवालानुसार, जगात मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण तरुणांमध्ये आढळून आले आहे. बदलते वातावरण आणि खाण्याच्या सवयींमुळे तरुण-तरुणी त्याला बळी पडत आहेत. जेव्हा स्वादुपिंड शरीरात इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन कमी करते किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा अनेक जण मधुमेहाच्या विळख्यात येतात.
प्रतिकारशक्ती मजबूत होते
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही जण औषधांसोबतच घरगुती उपायांचा अवलंब करतात. त्यापैकी असाच एक घरगुती उपाय आहे ज्यामध्ये तुमच्या रोजच्या आहारात आवळा आणि कोरफडीचा समावेश करून मधुमेहावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवू शकता. तसेच प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासोबतच हृदय, किडनी, यकृत निरोगी ठेवण्यासाठी ते प्रभावी आहे.
कोरफड फायदेशीर
कोरफड मध्ये एक आयुवेदीक घटक असतो, ज्याचा हायपोग्लाइसेमिक (ग्लूकोज कमी करणारा) प्रभाव असतो. याशिवाय, कोरफडमध्ये हायड्रोफिलिक फायबर, ग्लुकोमनन आणि फायटोस्टेरॉल सारखी इतर अनेक संयुगे देखील असतात जी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात.कोरफडीचे अनेक फायदे असतात, परंतु ते अनेक बाबतीत नुकसान देखील करू शकते. असे देखील होऊ शकते की कोरफडीचा गर चेहरा, केसांवर लावल्याने किंवा ते खाल्ल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोरफड वापरण्याचे ६ दुष्परिणाम जाणून घेऊ या:
पोटाची समस्या
कोरफडीच्या पानांमध्ये लेटेक्स असून ते झाडाच्या वरच्या थराखाली असते. अनेक जणांना लेटेक्सची ऍलर्जी असते, त्यामुळे पोटाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. या समस्यांमध्ये छातीत जळजळ, पेटके येणे आणि पोटॅशियमची पातळी कमी असू शकते.
त्वचेची अॅलर्जी
अनेकांना अॅलोवेरा जेलची ऍलर्जी असू शकते. अशा व्यक्तीनी अॅलोवेरा जेलचा वापर केल्यास त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणे, त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ आणि खाज सुटणे यासारख्या समस्या होऊ शकतात.
रक्तातील साखरेची पातळी
कोरफडीचा रस प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. कोरफडीच्या रसामध्ये रेचक प्रभाव असतो, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इलेक्ट्रोलाइट असंतुलन होण्याची शक्यता वाढते. जर मधुमेह असेल तर कोरफडीचा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
आवळ्याचा वापर
आवळा हे फळ शरीरातील इन्सुलिन सक्रिय करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी देखील ते कमी करते. रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यासाठी आवळा रस हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. तसेच आवळ्यामध्ये पॉलीफेनॉल असतात जे उच्च रक्तातील साखरेमुळे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
कोरफड सोबत आवळा पावडर
दोन्ही पावडर समान प्रमाणात घ्यावे आणि रिकाम्या पोटी घ्यावा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासह चयापचय वाढवण्यास मदत होते. याशिवाय कोरफडीचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. त्याचे प्रमाण जास्त नसून थोडे असावे. चव बदलण्यासाठी थोडा आवळा रस देखील घालता येतो.
अतिवापर केल्याने तोटे
कोरफडीचा अतिवापर केल्याने काही वेळा शरीराला काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. विशेषतः अतिसार, हायपोक्लेमिया म्हणजे पोटॅशियमची कमतरता, मूत्रपिंड निकामी होणे, फोटोटॉक्सिसिटी, त्वचेची जळजळ आणि अन्य समस्या उद्भवू शकतात.
(महत्वाची सूचनाः कोणतेही घरगुती आयुर्वेदिक उपाय वापरण्यापूर्वी आपल्या फॅमिली किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)