विशेष प्रतिनिधी, मुंबई
सुदृढ आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी बदामाचे सेवन करण्याची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून आहे. आजच्या काळातही अगदी तज्ज्ञ डॉक्टरांपासून ते आहारतज्ज्ञांपर्यंत काही प्रमाणात आहारात बदामांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कारण त्यात आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या अशा अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे.
दररोज एका भांड्यात रात्री बदाम भिजत टाकून सकाळी दुधात भिजलेले बदाम खाल्ल्याने हृदय, मधुमेह, लठ्ठपणा आणि त्वचा संबंधित समस्यादेखील दूर असतात. तसेच सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बदामामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. परंतु या फायद्यांबरोबरच त्याचे काही तोटे असून बदामांचे सेवन बीपी आणि किडनी स्टोनच्या रूग्णांसाठी हानिकारक ठरू शकते, म्हणून त्यांनी त्याचे सेवन करू नये, त्याबद्दल थोडे जाणून घेऊ या…
फायदे
भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनसंस्था योग्य राहते. तसेच जर आपल्याला वृद्धत्वावर नियंत्रण ठेवायचे असेल तर बदाम खावेत. कारण ते अँटी-ऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहेत. बदाम खाल्ल्याने रक्तातील अल्फल टकोफेरॉलचे प्रमाण वाढते, आणि ते रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी कार्य करते. त्याचप्रमाणे भिजवलेले बदाम खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यात फॉलिक अॅसिडची चांगली मात्रा असते, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान बाळाच्या मेंदूत आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमच्या वाढीस मदत होते. बदामाच्या सेवनाने वजनही सहज नियंत्रित केले जाऊ शकते.
यांनी बिलकुल खाऊ नये
हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी बदामाचे सेवन करू नये, कारण बीपी औषधांसह बदाम खाणे आरोग्यास हानी पोहोचवू शकते. तसेच ज्या लोकांना किडनी किंवा पित्त मूत्राशयात स्टोनची समस्या आहे, त्यांनीही बदाम खाऊ नये. पचनसंबंधित समस्या देखील असतील तर त्याने बदाम खाणे टाळावे, कारण त्यामध्ये भरपूर फायबर असते. एखादी व्यक्ती प्रतिजैविक औषध घेत असेल तर त्याने बदामही खाऊ नये. तसेच अॅसिडिटीच्या समस्येमध्येही बदाम खाणे योग्य नाही.