विशेष प्रतिनिधी, पुणे
कोरोनामुळे सर्वांचे रोगप्रतिकारशक्तीकडे लक्ष वेधले गेले. शारीरिक तंदुरुस्ती व निरोगी शरीराला अधिक महत्त्व प्राप्त झाले. आता रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोक वेगवेगळ्या शकली लढवत आहेत. पण आपल्या किचनमध्येच ओव्याच्या रुपात निरोगी जीवनाची चावी आहे, हे तुम्हाला माहिती होते का? आज आपण अजवाइन म्हणजेच ओव्याचे गुणधर्म जाणून घेऊ या.
आपण ओव्याचे छोटे रोपटेही घरात लावू शकतो. आयुर्वेदाचार्य डॉ. आर. राव सांगतात की प्रतिकारशक्तीला नवीन उर्जा देणारा ओवा खाण्यासोबतच वाफ घेण्यातही शरीराला फायदा पोहोचवतो. कोणत्याही स्वरुपात ओव्याचे सेवन करणे शरीरासाठी चांगलेच आहे. कोमट पाण्यासोबत चावून खाल्ला तरीही चालतो आणि पाण्यासोबत उकळून घेत पिऊन टाकला तरीही चालतो.









