मुकुंद बाविस्कर इंडिया दर्पण वृतसेवा
आलुबुखार हे असे फळ आहे जे खुपच चविष्ट असते. चवीला आंबट-गोड असलेले हे फळ आरोग्यासाठीही खुप फायदेशीर आहे. हे फळ आतून रसाळ असते. काळे, लालसर, जांभळे अशा रंगात ते उपलब्ध असते. हे फळ ताजे खाण्याव्यतिरिक्त, ते विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. जर कुणाची भूक मंदावत असेल, अपचनाचा त्रास होत असेल, कोलेस्टेरॉल खूप वाढले असेल तर तुम्ही हे फळ नक्की खावे. याशिवाय बद्धकोष्ठता आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फळ खूप फायदेशीर आहे.
वजन कमी करणे
आलूबुखार हे फळ लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. वास्तविक, या फळात खूप कमी कॅलरीज आढळतात. त्यामुळे हे फळ वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्याच वेळी, भरपूर फायबर असल्याने हे फळ वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते.
हृदयासाठी फायदेशीर :
हे फळ हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. याच्या सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. ताजे आलूबुखार फायदेशीर आहेत. कोरडे फळही उपयुक्त आहे. एथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच धमनीच्या भिंतींमध्ये कोलेस्टेरॉल, चरबी आणि प्लेक जमा होतात, ते रोखण्यास वाळलेले फळ मदत करते.
बद्धकोष्ठतेपासून आराम :
या फळात मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. बद्धकोष्ठता असेल तर या फळापासून आराम मिळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांना वाळलेले फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यात फिनोलिक तत्व असते ज्यामुळे आतड्यांसंबंधीची समस्या दूर होते.
मधुमेह, कोलेस्ट्रॉल
आपण जर मधुमेहाचे रुग्ण असाल, तर विशेषतः वाळलेले आलूबुखार खावेत. यामध्ये असलेले बायोएक्टिव्ह तत्व साखर नियंत्रणात ठेवते.
तसेच, या फळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. त्याचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल एलडीएल कमी होऊ शकते. वास्तविक, या फळामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे ते शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करू शकते.
health tips aaloo bukhar plums fruit benefits diabetes cholesterol weightloss