कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा उद्रेक झाल्याने भारताला इतका मोठा फटका बसला आहे की, देशाची आरोग्य आणि आर्थिक व्यवस्था असहाय झाली आहे. दररोज हजारो लोक मरत आहेत, लाखो लोकांना या विषाणूची लागण होत आहे. देशातील अनेक राज्यांत लॉकडाउन लादण्यात आला आहे. तसेच लोकांना फक्त आवश्यक गोष्टींसाठी घराबाहेर जाण्याचे आवाहन केले जात असून बाहेर जाताना सर्वांनी मास्क घालावे आणि सामाजिक अंतराचे पालन केले पाहिजे, असे वारंवार सांगण्यात येते, परंतु निम्मे लोक या गोष्टीचे पालन करत नाहीत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार सुमारे ५० टक्के लोक अजूनही मास्क लावत नाहीत.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले की, एका अभ्यासानुसार सुमारे ५० टक्के लोक अजूनही मास्क परिधान करत नाहीत, तर मास्क घालणाऱ्यापैकी ६४ टक्के लोक आपले नाक झाकत नाहीत. तसेच देशातील ८ राज्यांत १ लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण प्रकरणे असून ९ राज्यांत सुमारे ५० हजारांहून कमी सक्रिय रुग्ण आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना येथील साप्ताहिक चाचण्यांमध्ये भारतामध्ये सातत्याने वाढ झाली आहे आणि गेल्या १२ आठवड्यांत दैनंदिन चाचण्यांमध्ये सरासरी २.३ पट वाढ झाली आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, सुमारे १० आठवड्यांमध्ये कोविड -१९ प्रकरणातील पॉझेटिव्ह रुग्णांमध्ये सतत वाढ झाल्यानंतर आता गेल्या दोन आठवड्यांपासून घट नोंदविण्यात आली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!