मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता येण्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. १ एप्रिलपासून कुठलेही निर्बंध लागू करण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. आता राज्य सरकार का निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मोठा खुलासा केला आहे. डॉ. टोपे म्हणाले की, गुढीपाडव्याच्या शोभायात्रेबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत तर अन्य कोरोना निर्बंधांबाबत सध्या वेट अँड वॉच अशी स्थिती आहे, असे ते म्हणाले. बघा, त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/NCPspeaks/status/1509117589859225601?s=20&t=goQE5xV9vhQqrOhxwe50Ug