नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हे सध्या वादात सापडले आहेत. मांडवीय यांनी एम्सला भेट दिल्यानंतर देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर एक फोटो प्रसारित केला आहे. याची दखल घेत काँग्रेसने अतिशय आक्रमक होत प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हे असे करायला नको होते. त्यांचे हे वर्तन नैतिकतेचा अभाव असणारे आहे. शिवाय हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी तातडीने माफी मागावी, अशी आग्रही मागणी काँग्रस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
आरोग्यमंत्री मांडवीय यांनी डॉ. सिंग यांच्या तब्ब्येतीची चौकशी केल्यानंतर अतिशय लज्जास्पद वर्तन केले आहे. माजी पंतप्रधानांच्या खासगीपणाचे थेट उल्लंघन करणारे आणि किमान सभ्यतेचा अभाव असणारे आहे, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. या फोटोत दिसत आहे की, डॉ. सिंग हे उपचारार्थ दाखल आहेत. तर त्यांच्या पत्नी या डॉ. सिंग यांच्या शेजारी उभ्या आहेत.
https://twitter.com/rssurjewala/status/1449025246577577986