मुंबई – नाशिकमध्ये महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी घेतली आहे. त्यामुळेच दुर्घटना झालेल्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी डॉ. टोपे हे तातडीने नाशिककडे रवाना झाले आहेत. या सर्व प्रकाराची माहिती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या दुर्घटनेत ११ पुरुष आणि ११ महिला रुग्ण दगावल्याचे डॉ. टोपे यांनी सांगितले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. कुणाचीही हयगय केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ. टोपे यांनी सांगितले आहे.