मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
डोकेदुखीची समस्या असो किंवा कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत असो, डोक्याला थोडावेळ मसाज करणे हा प्रत्येक व्यक्तीसाठी चांगला उपचार असू शकतो. त्वचा असो वा केसांची काळजी, दोन्ही गोष्टींमध्ये आपण नेहमी काळजी घेतो. परंतु जेव्हा पायांचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पायाच्या मसाजच्या बाबतीत बहुतेक जणांच्या बाबतीतही असेच आहे. पण डोके आणि केसांप्रमाणेच पायाच्या मसाजचे देखील काही आरोग्य फायदे आहेत. त्याच्याबद्दल जाणून घेऊ या…
निद्रानाश
झोप न येण्याच्या समस्येला निद्रानाश म्हणतात. जर तुम्हालाही निद्रानाशाचा त्रास होत असेल तर रोज रात्री झोपताना तळव्यांची मालिश करा. पायाच्या तळव्याला मसाज केल्याने शरीराला आराम मिळतो आणि मन शांत होते.
तणाव-चिंता
एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाने घेरलेली असेल तर त्याला नैराश्याची समस्या असू शकते. अशा परिस्थितीत, तणाव दूर करण्यासाठी, आपण पायाच्या तळव्याची मालिश केली पाहिजे. तळवे मसाज केल्याने तणाव कमी होतो.
वेदना
तळव्यांना मसाज केल्याने महिलांना मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय असे केल्याने तणाव, थकवा यापासून आराम मिळतो.
रक्ताभिसरण
आयुर्वेदात रक्ताभिसरण वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शरीराला मसाज करणे. तळवे मसाज केल्याने संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह सुधारतो. रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी, आपण पायांच्या तळव्याची मालिश करणे आवश्यक आहे.
सांधेदुखी
रात्री झोपताना तळव्यांना मसाज केल्याने सांधेदुखीत आराम मिळतो.
या तेलाने मालिश करा
आयुर्वेदानुसार पायांच्या तळव्याला मसाज करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलाने शरीराला मसाज केल्याने अनेक समस्या दूर होतात. पण पायांच्या तळव्याला मसाज करण्यासाठी मोहरीचे तेल सर्वात फायदेशीर आहे.