मुंबई – राज्याच्या आरोग्य विभागाकडून विविध पदांसाठीच्या भरती दरम्यान आज लेखी परीक्षा होत आहे. मात्र, या परीक्षेत पुन्हा गोंधळ झाला आहे. यापूर्वीच गोंधळामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आज परीक्षा होत असताना पुन्हा गोंधळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन शहरातील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. तांत्रिक कारणामुळे गोंधळ झाल्याची कबुली आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे.
वेळेवर पेपर न मिळणे, आसन व्यवस्था चुकीची असणे असा गोंधळ समोर आला आहे. तर, नाशिकच्या गिरणारे येथील केबीएच केंद्रावर विद्यार्थी अधिक व पेपर कमी अशी स्थिती पहायला मिळाली. तसेच, वेळेत विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आला नाही. विद्यार्थ्यांना हॉल तिटीक न मिळणे, हॉल तिकीटावर चुकीची माहिती प्रसिद्ध असणे यासह विविध प्रकारच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
https://twitter.com/Mpsc_Andolan/status/1452139566316490754