बुधवार, ऑक्टोबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

२४ आणि ३० ऑक्टोबरला ‘आरोग्य’ची परीक्षा; ‘या’ सहापैकी एक ओळखपत्र आवश्यक

ऑक्टोबर 22, 2021 | 6:56 pm
in राज्य
0
corona 101

मुंबई – राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेश पत्राबरोबरच आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा संचालक डॉ अर्चना पाटील यांनी याबाबत माहिती दिली. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने गट ‘क’ संवर्गातील भरतीसाठी 24 ऑक्टोबर 2021 रोजी तर गट ‘ड’ करिता 31 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत डॉ. पाटील यांनी उमेदवारांना आवाहन केले आहे.

कोरोना १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेतील गट-क व गड-ड सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली होती. त्यानुसार गट-क संवर्गाचे २ हजार ७३९ व गट-ड संवर्गाचे ३ हजार ४६६ पदांची, असे एकूण ६ हजार २०५ पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार गट-क संवर्गाची लेखी परीक्षा २४ ऑक्टोबर २०२१ रोजी व गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी दिली आहे.

सहापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा
त्यांनी आवाहनात नमूद केले आहे की, उमेदवारांनी प्रवेशपत्रावर आपले छायाचित्र चिकटवावे. त्यासोबतच पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, छायाचित्र असलेले राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, मूळ आधार कार्ड यापैकी एक ओळखपत्र म्हणून सोबत ठेवावे. सोबत निळ्या अथवा काळ्या शाईचा बॉलपेन घ्यावा. परीक्षेच्या वेळी मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रवेश पत्रावर नमूद वेळेपेक्षा एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

गैरप्रकार रोखण्यासाठी माहिती द्यावी
परीक्षेच्या अनुषंगाने काही गैरप्रकारांची माहिती मिळाल्यावर तात्काळ ०२०-२६१२२२५६ या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ या वेळेत संपर्क साधावा. त्याचबरोबर नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी. याबाबत [email protected] या ई-मेल वर माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा
उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. परीक्षेबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

प्रवेश पत्र ईमेल, व्हॉटसअॅपवर
परीक्षा घेणाऱ्या न्यासा या कंपनीस सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र ईमेल, व्हाटस-अप मोबाईल वर पाठवून देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. कंपनीव्दारे केल्या जाणारी बैठक व्यवस्था, केंद्राचे आरक्षण, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बैठक व्यवस्थेचे नियोजन, केंद्रामध्ये जॅमर बसविणे, प्रवेश पत्र निर्गमित करणे, प्रश्नपत्रिकांचे वाटप आदी न्यासा कंपनीमार्फत केले जात आहे.

उत्तर महाराष्ट्रातील स्थिती
सदरील भरती परिक्षा राज्यस्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गासाठी घेण्यात येत आहे. राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबधित सहसंचालक असून मंडळ स्तरावरील पदांचे नेमणुक अधिकारी ८ उपसंचालक मंडळे आहेत. नाशिक परिमंडळात गट-क मधील ६८ हजार ६८६ उमेदवार परिक्षा देण्यार असून तिन्ही जिल्हयातील एकुण १४२ परिक्षा केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा प्रथम सत्रात १८ हजार ०८७, व्दितीय सत्रात १८हजार १८३ उमेदवार परीक्षा देणार आहेत. जळगाव जिल्ह्यात द्वितीय सत्रात १४ हजार ७४८ तर अहमदनगर जिल्ह्यात दितीय सत्रात १७ हजार ६६८ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

पुणे ब्युरो
या आरोग्य विभागाच्या भरती मध्ये पुणे ब्युरो कार्यालयातील १)केमीकल असिस्टंट २) सांख्यिकी सहाय्यक ३) औषध निर्माण अधिकारी ४) कनिष्ठ लिपीक या ४ संवर्गाची परिक्षा अहमदनगर जिल्हयात होत असून त्या पदांचे पुणे ब्युरो कार्यालय हेच नियुक्ती कार्यालय आहे.त्यामुळे त्या पदांकरिता अर्ज केलेल्या राज्यभरातील उमेदवारांना अहमदनगर जिल्हयात प्रवेश पत्र मिळालेली आहेत.

येथे संपर्क साधा
उपसंचालक,आरोग्य सेवा ,नाशिक मंडळ ,नाशिक या कार्यालयात मे,न्यासा कम्युनिकेशन या कंपनीने २ प्रतिनिधी नेमून हेल्प डेस्क स्थापन केलेले असून अडमिड कार्ड व इतर शंकाचे निरसन करण्यासाठी उमेदवारांनी ९५१३३ १५५३५ , ७२९२०१३५५०, ९५१३५००२०३ क्रमांकावर संपर्क साधावा, असेही डॉ.गांडाळ यांनी कळविले आहे. तसेच गट ड बाबतची परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ला होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – दुकान फोडणा-या चोरट्यास जिल्हा न्यायालयाने ठोठावली दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा 

Next Post

नाशिक विभागात सव्वा कोटी नागरीकांचे लसीकरण; सर्वाधिक ‘या’ जिल्ह्यात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Next Post
कोरोना लस

नाशिक विभागात सव्वा कोटी नागरीकांचे लसीकरण; सर्वाधिक 'या' जिल्ह्यात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011