लासलगाव – लासलगाव येथे तीन दिवसीय मोफत कोविड तपासणी व आरोग्य शिबिरास प्रारंभ आज करण्यात आला. जयदत्त होळकर मित्र मंडळ लासलगांव,नाज ए वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्था लासलगांव,मदिना सोशल ग्रुप रजा नगर,पिंपळगांव (नजिक),जमियत उलेमा – ए – हिंद शाखा लासलगाव व सत्य मालिक लोकसेवा ग्रुप मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगांव येथील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत लासलगांव ग्रामपंचायतच्या वाचनालयात मोफत कोविड तपासणी तसेच आरोग्य निदान शिबिराचे उदघाटन नाशिक जिल्हा काँग्रेस चे प्रवक्ते गुणवंत होळकर यांच्या हस्ते करण्यात आले
मालेगाव येथील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या आरोग्य शिबीराच्या काल पहिल्या दिवशी ९१ कोरोना रॅपीड टेस्ट करण्यात आल्या व ४२४ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या त्याचसोबत लासलगाव ग्रामपंचायत कर्मचारी यांची कोविड -१९ रॅपीड टेस्ट देखील करण्यात आली.आज २० व उद्या २१ एप्रिक पर्यंत सदर आरोग्य शिबीर सुरू राहणार आहे
लासलगाव व परिसरातील नागरिकांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन लासलगाव ग्रामपंचायत चे सरपंच जयदत्त होळकर,उपसरपंच अफजल शेख,पिंपळगाव नजीक ग्रामपंचायत सदस्य लतीफ तांबोळी,मिरान पठाण यांनी केले आहे.या वेळी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी रउफ पटेल,माजी उपसरपंच संतोष ब्रम्हेचा,ग्रामविकास अधिकारी शरद पाटील,मौलाना खलील,फरीदा काजी,ग्रामपंचायत कर्मचारी पवन सानप,बाबा गीते,विलास खैरणार,मयूर विस्ते,समीर बेग,सुरेश शेजवळ,सोनू शेजवळ,सचिन शिकलकर,अर्षद शेख आदी उपस्थित होते