मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी वस्त्र हे वर्षातून किंवा कालांतराने खरेदी केले तरी खूप वर्ष वापरता येते, तसेच निवारा हा एकदा बांधला की आयुष्यभर त्यात राहता येते, परंतु अन्न मात्र दररोज किंवा नेहमी तयार करावे लागते. तसेच त्याचे योग्य प्रकारे सेवन करावे लागते. परंतु आरोग्यासाठी किंवा चांगले आयुष्य जगण्यासाठी नेमके काय खावे? याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात, तसेच याबाबतही असू शकतात. परंतु निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी सकस आणि योग्य आरोग्यपूर्ण आहार घेणे गरजेचे ठरते.
आहार आणि आरोग्याबाबत अनेक वेळा संशोधन आणि सर्वेक्षण करण्यात आले आहे त्याबाबतचे निष्कर्ष देखील जाहीर झालेले आहेत. ते समजून घेणे गरजेचे ठरते. अन्नाचा मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम पाहणे हा या अभ्यासाचा उद्देश होता. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सॅलमन माश्यामध्ये पोषक तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात, ज्याच्या एका सर्व्हिंगमुळे आयुष्य 13 मिनिटांनी वाढू शकते.
एका संशोधकांच्या टीमच्या , संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे नागरिकांना आपले आरोग्य आणि पर्यावरण अधिक चांगले बनवण्यासाठी मदत मिळेल. निरोगी आयुष्य हवे असेल तर आहारात चांगला बदल करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटते की त्याला चांगले दिर्घ आयुष्य मिळावे, भरपूर जगता यावं.
वर्ल्ड लाइफ एक्सपेक्टन्सीनुसार, भारतात पुरुषांचे सरासरी आयुष्य 69.5 वर्ष तर महिलांचे सरासरी आयुष्य 72.2 वर्ष इतकं असतं. हृदयासंबंधित आजार, फुप्फुसांचा आजार, स्ट्रोक, मधुमेह यासह किमान 50 असे आजार आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा कमी वयातच मृत्यू होऊ शकतो.
विज्ञानानुसार, एखादी व्यक्ती चांगल्या पदार्थांचे सेवन करत असेल तर त्याचे आयुर्मान वाढ शकते आणि कोणी अनहेल्दी पदार्थ खात असेल तर त्यांचे आयुष्य कमीही होऊ शकते. एखाद्याची लाइफस्टाइल चांगली असेल तर ती व्यक्ती बराच काळ जगते, आणि एखाद्याचे जीवनमान चांगले नसेल, तर त्याचे आयुष्यही कमी होते. त्यामुळे आहार आणि लाइफस्टाइलमध्ये बदल केल्यास आयुष्य वाढवता येऊ शकते
एका रिपोर्टनुसार, मिशीगन विद्यापीठातील तज्ज्ञांनी खाण्याचे काही पदार्थ आणि त्यांचा आरोग्यावर होणार परिणाम जाणून घेण्यासाठी संशोधन केले. त्यामध्ये काही असे पदार्थ आढळले, जे एकदा खाल्यास आयुष्य काही मिनिटांनी वाढते तर काही पदार्थांचे एकदा जरी सेवन केले तरी आयुष्य काही मिनिटांनी कमी होते. उदाहरणार्थ, जर कोणी ड्रायफ्रुट्सचे सेवन केले तर त्या व्यक्तीचे आयुष्य 26 मिनिटांनी वाढू शकते. पण एखाद्या व्यक्तीने एकदा जरी हॉट-डॉग खाल्ला तर त्याचे आयुष्य 36 मिनिटांनी कमी होऊ शकतं. त्याशिवाय पीनट बटर, जॅम सँडविच खाल्ल्यानेही व्यक्तीचे आयुष्य अर्ध्या तासाने वाढू शकतं.
या खाद्य पदार्थांमुळे कमी होते आयुर्मान
हॉट डॉग : आयुष्यातील 36 मिनिटे कमी होतात.
चीझ बर्गर : आयुष्य 8.8 मिनिटांनी कमी होते.
सॉफ्ट ड्रिंक : आयुष्यातील 12.4 मिनिटे कमी होतात.
पिझ्झा : आयुष्य 7.8 मिनिटांनी कमी होते.
या खाद्य पदार्थांनामुळे आयुष्य वाढते
पीनट बटर आणि जॅम सँडविच : आपल्या आयुष्यातील 33.1 मिनिटे वाढतात.
तरबेक्ड सॅलमन मासा : आयुष्य 13.5 मिनिटांनी वाढते.
केळी : आयुष्याची 13.5 मिनिटे वाढतात.
टोमॅटो : आयुष्य 3.8 मिनिटांनी वाढते.
ॲव्हकाडो : आयुष्यातील 1.5 मिनिटे वाढतात.
Health Age Food Nutrition Research Study