इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही शाळेत शिक्षक असो की मुख्याध्यापक यांनी शाळा किंवा शिक्षण संस्थेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. परंतु काही जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आसाममधील एका शाळेतील मुख्याध्यापिकेला जेवणाच्या डब्यात गोमांस आणणे पडले महागात पडले.
गोलपारा जिल्ह्यातील हुरकाचुंगी मिडल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डालिमा नेसा यांना तक्रारीनंतर अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ती केवळ गोमांस घेऊन शाळेत आली नाही तर तीने इतर शिक्षकांनाही ते दिले असल्याचा आरोप आहे.
गोलपारा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अटकेनंतर शिक्षकाला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी बाकीची चौकशी करण्यात येत आहे. नेसा शाळेत गोमांस घेऊन आली होती आणि जेवणाच्या सुट्टीत ते इतर शिक्षकांनाही देत होती, असा आरोप आहे.
विशेष म्हणजे, त्याच दिवशी सरकारी शाळांची तपासणी करण्यासाठी अधिकारीही आले होते. आसाममध्ये गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी नाही, परंतु गेल्या वर्षी विधानसभेत पारित झालेल्या आसाम कॅटल प्रिझर्वेशन अॅक्टनुसार, ज्या भागात हिंदू, शीख, जैन किंवा इतर गोमांस न खाणारे समुदाय राहतात. शाळा किंवा मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर त्याच्या विक्रीवर बंदी आहे. पोलिसांनी सांगितले की, नेसा आयपीसीचे कलम 153A आणि 295A लागू केले आहे. ती गोमांस विकत नसल्याने तिच्यावर आसाम कॅटल प्रिझर्वेशन अॅक्ट लादण्यात आलेला नाही. तसेच त्याच्यावर कोणत्याही गायीच्या हत्येचा आरोप नव्हता.