नवी दिल्ली – ‘टारझन’ किंवा ‘मोगली’ च्या कथा आपण ऐकल्या किंवा त्याचे चित्रपट पाहिले, परंतु वास्तविक जीवनात एखादा टारझन असल्याची कल्पना तरी करू शकता का? परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एका देशात प्रत्यक्षात एक ‘टारझन’ असून सुमारे आठ वर्षांपूर्वी लोकांना त्याची माहिती झाली.
सुमारे ४१ वर्षे जंगलात राहिल्यानंतर या टारझनला मानवी समाजामध्ये आणण्यात आले, पण दुःखाची गोष्ट म्हणजे हा टारझन मनुष्यांमध्ये फक्त ८ वर्षांपर्यंत राहून मरण पावला. त्याच्या मृत्यूचे कारणही खूप वेदनादायक आहे. सन १९७२ मध्ये व्हिएतनाम – अमेरिका युद्धादरम्यान अमेरिकन बॉम्बस्फोटात हो व्हॅन लँग या मुलाच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला. तेव्हा तो व्हिएतनामच्या जंगलात वडिलांसोबत राहत होता. त्याचे वडील हो व्हॅन थान एक व्हिएतनामी सैनिक होते,
व्हिएतनाम युद्धाच्या वेळी ते जंगलात लपण्यासाठी त्याच्या लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी आले होते. बॉम्बस्फोटात त्यांची पत्नी आणि इतर दोन मुले ठार झाली. तेव्हापासून वडील आणि मुलगा जंगलात राहू लागले होते. छोटा बालक लँगने त्याच्या आयुष्यात इतर कोणत्याही मनुष्याला पाहिले नव्हते. त्याला मानवी सभ्यता, कपडे, बोलणे, खाण्यापिण्याबद्दल काहीच कल्पना नव्हती.
परंतु वर्ष २०१३ मध्ये लोकांना या दोघांबद्दल माहिती मिळाली आणि दोघांनाही मानवांमध्ये आणण्यात आले. पण दुर्दैवाने, लँगचे वडील मानवी समाजाशी तसेच प्रथा, परंपरा, चालीरीती आणि दैनंदिन जीवनाशी जुळवून घेऊ शकले नाहीत आणि त्यांची आरोग्य स्थिती अधिकच बिघडली. यानंतर, मानवी सभ्यतेत आल्यानंतर केवळ ८ वर्षांनी, लँगने देखील या जगाला निरोपही घेतला.
वास्तविक लँग जंगलात अतिशय निरोगी जीवन जगत होता, परंतु मानवांमध्ये असताना फक्त आठ वर्षांनी, लँगला यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. डो कास्टवे कंपनीचे एल्वारो सेरेझो हे लँगला भेटले होते. एल्वारोने सांगितले की, मानवी जगात आल्यानंतर झालेल्या बदलामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. कारण लांजे यांनी तयार केलेले पदार्थ खाण्यास सुरुवात केली. याशिवाय, त्यांची कार्यपद्धती देखील जंगलाच्या तुलनेत खूप वेगळी होती.