इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणतीही व्यक्ती प्रेमात असल्यावर खूपच आनंदी असते आणि सर्वात जास्त दुःख होतं ते ब्रेकअप झाल्यावर. आपण एकत्र घालवलेले क्षण, आनंदी क्षण हे सगळं आठवून आठवून दुःख अधिक वाढतं. कोणालाही आपल्या नात्यात ब्रेकअप आणि दुरावा नको असतो. पण कधीतरी अशी वेळ येते की, दोन व्यक्तींचं पटत नाही आणि त्यांच्या नात्यात दुरावा येऊन ब्रेकअप होतं. पण ब्रेकअप नक्की का झालं किंवा याची नक्की कारणं काय आहेत हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. प्रत्येकाचं ब्रेकअप होण्याची कारणे वेगवेगळी असतात.
खरं तर नात्यात असाताना दोन व्यक्ती एकमेकांशी इतक्या जोडल्या जातात की, त्यांच्यासाठी वेगळं होणं अत्यंत कठीण असतं. पण बऱ्याचदा असं होतं की, दोघेही एकमेकांच्या सवयी आणि वागण्यावरून भांडण करतात. अशा परिस्थितीत एकमेकांबरोबर राहणं अशक्य असतं. असं नातं पुढे नेणं नक्कीच योग्य नसतं. त्यामुळे योग्य वेळी ब्रेकअप करणं योग्य ठरतं. काही वेळा दोघांपैकी एका जोडीदाराकडून नात्यामध्ये योग्य रूची न दाखवल्यामुळेही नातं टिकत नाही.
आजकाल अनेकजण लग्नाआधी रिलेशनशीपमध्ये राहण्याला प्राधान्य देतात. तेव्हा हृदयाचे जास्त एकलं जातं, तेव्हा ती कायम एकत्र राहतील याची खात्री नसते. काही जोडपी समजुतदारपणे आपलं नातं पुढे नेतात. तर काहीजण तीन चार वर्षांच्या डेटींगनंतर नाते संपवतात. असे का होते? एकमेकांबरोबर आयुष्य काढू शकत नाही याचा अंदाज काही परिस्थितीमुळे या काळात येतो. तसेच दोघांच्या विचारांमधील फरक आणि मूल्य प्रणालीमध्ये झालेल्या तीव्र बदलापासून ते जोडीदारावरील आत्मविश्वासापर्यंत अनेक समस्यांना या कपल्सना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कदाचित ते ब्रेकअप करतात. त्यामागे कदाचित ही काही वेगळी कारणं असू शकतात. आजच्या काळात तरुणांमधील नाती ही फारच कमकुवत असतात असे म्हणून शकतो. त्याचे कारण म्हणजे तरुणांमध्ये रिलेशनशीप तयार होणे आणि पुन्हा त्यांचा ब्रेकअप अप होणे ही त्यांच्यासाठी फारशी धक्कादायक बाब राहिलेली नाही.
अगदी एक ब्रेक अप करायचे आणि लगेच दुसरे नाते जोडायचे असे अनेक तरुण करत असतात. विशेष म्हणजे या तरुणांचे ब्रेकअप होण्याची कारणेही अगदी मजेशीर आणि अनेकदा आपल्यासाठी धक्कादायक असतात. तरुणांना मात्र या कारणांमध्ये काहीही गैर वाटत नाही. आपल्या पार्टनरला मात्र ते प्रत्येकवेळी खरे कारण सांगतीलच असे नाही. असाच एकाचा हा आगळावेगळा किस्सा, या तरूणाने गर्लफ्रेन्डसोबत ब्रेकअप केलं कारण त्याच्या आईला आणि इतर नातेवाईकांना त्याची प्रेयसी पसंत नव्हती. पण ब्रेकअपआधी तरूणाने एका तरूणीवर साधारण २३ लाख रूपये खर्च केले. या गोष्टीचा खुलासा त्या तरूणीने एका व्हिडीओच्या माध्यमातून केला.
प्रिया नावाच्या तरुणीने टिकटॉक व्हिडीओ शेअर करून या घटनेबाबत सांगितलं. माजी बॉयफ्रेन्डच्या या वागण्यावरून तीन पुरूषांबाबतही एक कमेंट केली आहे. प्रिया म्हणाली की, अनेक पुरूष हे संभ्रमात असतात. याबाबत प्रिया पुढे म्हणाली की, ब्रेकअप करताना त्याने म्हणजे जानूने तिच्यावर साधारण ९ लाख रूपये आणि नंतर साधारण १४ लाख रूपये खर्च केले. अर्थातच बॉयफ्रेन्ड श्रीमंत आहे आणि या इतक्या खर्चामुळे त्याचे काहीही नुकसान होणार नाही.
प्रियाने पुढे सांगितलं की, मला या कारणाने वाटतं की, जानू फार श्रीमंत आहे, कारण त्याची कार शानदार आहे. त्याशिवाय कारण नसतानाही तो मला अनेक महागड्या ठिकाणांवर घेऊन गेला होता. ज्या आठवड्यात आमचं ब्रेकअप झालं होतं. तेव्हापासूनच तो मला महागडे गिफ्ट देत होता. तेव्हा मला फार विचित्र वाटलं होतं. त्यानंतर, त्याने एक दिवस अचानक माझ्या घरातील सगळं फर्निचर सह सर्व काही बदललं. त्याने जुन्या वस्तूंजागी नव्या वस्तू आणल्या.माझ्यासाठी इतका खर्च केल्यावर कुणी माझ्यासोबत ब्रेकअप करणार नाही अस वाटलं म्हणून मी त्याला ब्रेकअपचं कारण विचारलं तर माझा जानू म्हणाला की, त्याची आई आणि इतर नातेवाईकांना मी पसंत नाही. आता ही घटना परदेशातली असली तरी आपल्या भारतात देखील असेच घडते आणि यामध्ये मुलींचे नुकसान होते.
He Spent 20 Lakh rupees on Girlfriend after that
Love Story Breakup Social Viral