मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ग्राहकांना बँकेच्या काही सेवांसाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. ग्राहकांच्या खात्यातील तिमाही किमान शिल्लक रकमेची मर्यादा वाढण्यात आली आहे. तसेच सर्व प्रकारच्या लॉकर्ससाठी लॉकर फी वाढवण्यात आली असून डिमांड ऑफ ड्रॉप आणि चेकसाठी ही शुल्क आकारणी वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बचत खात्यातून केवळ तीन वेळा विनामूल्य पैसे काढता येतील, त्यानंतर शुल्क आकारणी करण्यात येईल. तर दुसरीकडे एचडीएफसी बँकेच्या ईमेल आणि एसएमएसद्वारे इन्स्टा अलर्ट सेवांसाठी शुल्क बदलण्यात आले आहे. एसएमएस कमी करण्यात आले असून ईमेल अलर्टसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
तिमाहीत आकारले जाईल
पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) मेट्रो शहरातील ग्राहकांना बँकेच्या खात्यात तिमाही किमान शिल्लक 5 हजारांवरून 10000 ठेवावी लागणार आहे, तर ग्रामीण आणि निम शहरी भागात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल शुल्क 200 रुपयांवरून 400 रुपये प्रति तिमाही करण्यात आले आहे. शहरी आणि मेट्रो भागांसाठी ते 300 रुपयांवरून 600 रुपये करण्यात आले आहे. हे शुल्क तिमाहीत आकारले जाईल. बँकेचे हे नवीन दर 15 जानेवारी 2022 पासून लागू होतील.
मोफत लॉकर
सर्व क्षेत्रांसाठी आणि XL आकाराचे लॉकर वगळता सर्व प्रकारच्या लॉकर्ससाठी लॉकर फी वाढवण्यात आली आहे. शहरी आणि मेट्रो भागात लॉकर फीमध्ये 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी, एका वर्षात 15 विनामूल्य लॉकर भेटीचे वेळापत्रक होते; यानंतर प्रत्येक भेटीसाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात आले. 15 जानेवारीपासून मोफत लॉकर भेटींची संख्या 12 पर्यंत खाली येईल, त्यानंतर ग्राहकांना प्रति भेटीसाठी 100 रुपये आकारले जातील.
हे शुल्कही वाढणार
नवीन दरानुसार दि. 1 फेब्रुवारीपासून, डेबिट खात्यात पैसे नसल्यामुळे ग्राहकांना कोणताही हप्ता किंवा गुंतवणूक अयशस्वी झाल्यास, त्यासाठी 250 रुपये भरावे लागतील. आतापर्यंत यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यास आता तुम्हाला 150 रुपये द्यावे लागतील. यासाठी केवळ 100 रुपये आकारण्यात आले होते, मात्र 1 फेब्रुवारी 2022 पासून, NACH डेबिटवर परतावा शुल्क प्रति व्यवहार 100 रुपयांऐवजी 250 रुपये प्रति व्यवहार असेल.
हे शुल्कही वाढले
बॅंकेने 1 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या चेकवरील शुल्क 100 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आले आहे. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चेक रिटर्नसाठी 200 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क भरावे लागेल. जर तुम्ही बँकेच्या शाखेत बचत खात्यातून महिन्यातून 3 वेळा पैसे जमा केले तर ते विनामूल्य असेल, परंतु त्यापेक्षा जास्त रकमेसाठी तुम्हाला प्रति व्यवहार शुल्क 50 रुपये द्यावे लागतील. पूर्वी हे 25 रुपये होते आणि एका महिन्यात 5 वेळा विनामूल्य व्यवहार होते.
HDFC – या चार्जेसमध्ये मोठे बदल
HDFC बँकेने InstaAlerts सेवा शुल्कात महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल दि. 1 जानेवारी पासून लागू झाले आहेत. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ईमेल आणि एसएमएसद्वारे इन्स्टा अलर्ट सेवांसाठी शुल्क बदलण्यात आले आहे. जर ग्राहक Insta Alert SMS सेवेसाठी प्रति तिमाही रुपये 3 भरत असतील तर ते आता फक्त 20 पैसे + GST प्रति एसएमएस भरतील. त्याचवेळी, ईमेल अलर्टसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
वेबसाइटवर माहिती
HDFC बँकेच्या InstaAlerts या सेवेचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तुम्हाला नेटबँकिंगच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
ग्राहक आयडी आणि पासवर्ड टाकून या वेबसाइटवर लॉग इन करा.
पुढील टप्प्यात, InstaAlerts वर क्लिक करा.
त्यानंतर खाते क्रमांक निवडावा लागेल. तुम्ही येथून नोंदणी किंवा डी-नोंदणी करू शकता.
त्यानंतर तुम्ही पर्याय निवडून पुष्टी करू शकता.
HDFC बँकेचे ग्राहक त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा मागोवा ठेवण्यासाठी बँकेच्या InstAlert सेवेचा वापर करू शकतात. तसेच InstAlert निवडून बिलाची अंतिम मुदत, वेतन क्रेडिट, कमी शिल्लक आणि इतर माहिती तपासू शकतात.