मुंबई – देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेत नोकरीची संधी अनेकांना मिळणार आहे. एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि या क्षेत्रातील आपली पोहोच आणखी मजबूत करण्यासाठी बँकेना हा निर्णय घेतला आहे. यासाठीच बँक देशामध्ये ५०० नवीन शाखा सुरू करणार आहे. त्याअंतर्गत रिलेशनशीप मॅनेजरची ५०० पदे भरली जाणार आहेत.
एचडीएफसी बँकेने ५७५ जिल्ह्यांमध्ये आपल्या एमएसएमई शाखा सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत बँकेच्या एमएसएमई शाखा ५४५ जिल्ह्यांमध्ये कार्यरत होत्या, आता या आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे ५८० त्याहून अधिक जिल्ह्यांत विस्तारल्या जातील. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर बँकेच्या एमएसएमई शाखांमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २,५०० पर्यंत वाढेल. जूनअखेर बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख २३ हजार होती. सध्या एचडीएफसी बँकेच्या ६३० शाखा कार्यरत असून त्यापैकी ५४५ शाखांमध्ये विशेष एमएसएमई काउंटर सुविधा आहे.