मुंबई – एचडीएफसी बँकेनं होळीनिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष निश्चित ठेव योजना (स्पेशल फिक्स डिपॉझिट स्किम) तिसऱ्यांदा वाढवली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँककडून सिनियर सिटिझन केअर एफडी स्किम नावाची विशेष योजना सुरू केली आहे. या विशेष एफडी योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांपेक्षा जास्त व्याज मिळते.
कोरोना काळात १८ मे २०२० मध्ये घसरलेल्या व्याजदरात ही विशेष एफडी ऑफर उपलब्ध करून देण्यात आली होती. एचडीएफसी बँक या ठेवींवर ७५ बेसिस पॉइंटस व्याज देत आहे. सीनियर सिटिझन केअर एफडीअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी निश्चित ठेव केल्यास एफडीला लागू असलेला व्याजदर ६. २५ टक्के असेल. हे दर १३ नोव्हेंबर २०२० पासून लागू आहेत.
एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार, १८ मे ते ३० जून या कालावधीत विशेष ठेवींच्या ऑफर दरम्यान ज्येष्ठांना ०.२५ टक्के (सध्याच्या ०.५० टक्के प्रीमियमपेक्षा अधिक) अतिरिक्त प्रीमियम देण्यात येईल. मुतठेवी एका दिवसापासून १० वर्षांपर्यंत ५ कोटींपेक्षा कमी आणि ५ वर्षांची असणं आवश्यक आहे. एचडीएफसी बँक ७ दिवस ते २९ दिवसांच्या ठेवीवर २.५० टक्के व्याज तसंच ३०-९० दिवसांच्या मुदतीत जमा असलेल्या ठेवींवर ३ टक्के व्याज देते.
९१ दिवस ते ६ महिन्यांच्या ठेवींवरील व्याजदर ३.५ टक्के आणि एक महिना व ६ महिन्यांपेक्षा कमी ठेवींसाठी व्याज दर ४.४ टक्के आहे. एफडी मॅच्युरिटीवर एका वर्षात बँक ४.९ टक्के व्याज देते. एक आणि दोन वर्षात परिपक्व एफडी व्याजदर ४.९ टक्के आहे.
दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत एफडीवर ५.१५ टक्के व्याज आणि ३ ते पाच वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याज ५.३० टक्के आहे. मुदतपूर्व कालावधी १० ते १५ वर्ष असेल. ठेवींवर ५.५० टक्के व्याजदर दिला जाईल.