माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…
गेल्या ५-६ दिवसापासून पुण्या- मुंबईत पोहोचलेल्या मान्सूनची अजूनही प्रगती नाही. खान्देश नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजून मान्सून पोहोचलेला नाही.
सध्याचे १०-१२ दिवस म्हणजे १९ जूनपर्यंत पावसासाठी वातावरण अनुकूल नसले तरी उद्या गुरुवार ५ जूनपासून पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार ७ जूनपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
विदर्भातील ११ जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता या तीन दिवसात जाणवते. कोकण -मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. रविवार दि. ८ जूननंतर, वातावरणातील बदलानुसार पुढील माहिती सूचित करता येईल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.