बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश….या जिल्ह्यात पावसाचा जोर

मे 25, 2025 | 5:16 pm
in संमिश्र वार्ता
0
rain1

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…..
१- मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश
काल शनिवार दि २४ मे रोजी मान्सून केरळ, तामिळनाडू ओलांडून कर्नाटकापर्यंत एका दिवसात पोहोचला. आज संपूर्ण गोवा काबीज करत दक्षिण कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ पर्यंत पोहोचून मान्सूनने त्याच्या नेहमीच्या वेळपेक्षा ११ दिवस आधी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.

२-कोकण व गोवा पाऊस –
आजपासून संपूर्ण आठवड्यात म्हणजे शनिवार दि. ३१ मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर व प्रभाव अधिक राहील.

३- उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस
कोकण वगळता खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आज व उद्या ( रविवार व सोमवारी ) जोरदार पावसाची शक्यता जाणवत असून मंगळवार दि. २७ मे पासून पावसाचा जोर काहीसा कमी होवून केवळ भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
अर्थात मान्सून च्या महाराष्ट्रातील वाटचालीनुसार आता ह्यापुढे पावसाची कमी अधिक तीव्रता जाणवेल.

४- खरीप पेरणी-
यावर्षी मे महिन्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे जमिनीत भरपूर ओल निर्माण झाली असुन पुढील मशागतीस सध्या वाफसा नाही. त्यातच मान्सून ने आजच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. वाफस्यासह मे महिन्यातच जर पेरणी केली तर ती पेरणी वेळेआधीची आणि अतिआगाप ठरु शकते. कारण उष्ण-सवहनी प्रक्रियेतून अवकाळी पावसाने मिळालेली जमीनओल आणि प्रशांत महासागरातून मान्सूनी वाऱ्यांनी वाहून आणलेल्या आर्द्रतेतुन झालेल्या मान्सून च्या पावसानंतर पूर्वओलीस मिळालेल्या थंडाव्यातील ओलीची साथ ह्यात नक्कीच फरक आहे, असे वाटते. मान्सून च्या चांगल्या पावसानंतर जमीन ओलीस अधिक थंडावा मिळाल्यनंतरच जुनमध्ये शेतकऱ्यांनी चांगल्या वाफस्यावरच पेरणीचा विचार करावा, असे वाटते. अर्थात ह्या बाबत चा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या स्वतः च्या विवेकानुसार घ्यावा, असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लालु प्रसाद यांचा निर्णय….मोठा मुलगा तेजप्रताप यादवची पक्षातून केली हकालपट्टी

Next Post

सिन्नरला मुसळधार पाऊस…रस्त्यावर पाणी साचले, बस स्थानकात बसवर स्लॅब कोसळला

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
IMG 20250525 WA0339 1 scaled e1748176548309

सिन्नरला मुसळधार पाऊस…रस्त्यावर पाणी साचले, बस स्थानकात बसवर स्लॅब कोसळला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011