माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१-प्रशांत महासागरातील समुद्री पाण्याचे तापमान व तेथील हवेचे दाब व मान्सून आगमनासंबंधीच्या इतर पाच वातावरणीय घडामोडी पाहता मान्सून देशाच्या दक्षिण टोकावर म्हणजे केरळात त्याच्या सरासरी तारखेच्या चार दिवस अगोदर म्हणजे २७ मे या प्रावधानिक तारखेला दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी ३० मे ला अपेक्षित असतांना तो ३१ मेला केरळात दाखल झाला व प्रत्यक्षात महाराष्ट्रात मान्सूनची अरबी समुद्रीय शाखाच १० ते ११ जूनला महाराष्ट्रात पोहोचली होती. परंतु मान्सूनी प्रवाहात ताकद नव्हती. ह्या वर्षी २७ मे ह्या तारखेत कमी अधिक चार दिवस विचारात घेतले तर मान्सून ह्या वर्षी केरळात २३ ते ३१ मे दरम्यान कधीही दाखल होवु शकतो. मुंबईत १० जूनला व सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात १५ जुनला मान्सून अपेक्षित असला तरी अरबी समुद्रात पश्चिम की. पट्टी समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात बळकपणा किती आहे, हे पाहूनच महाराष्ट्रात मान्सून जुनच्या कोणत्या तारखेला प्रवेश करील, हे सांगता येईल. त्या अगोदर पूर्वमोसमी अवकाळी पावसाच्या सरीची अपेक्षा करू या!
२- यावर्षी पुढील १५ दिवस म्हणजे २५ मे पर्यंत पूर्वमौसमी गडगडाटी अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे, दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता असल्यामुळे दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही. त्यामुळे यावर्षीचा मे महिना आल्हाददायक जाईल असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune