माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
……
१- महाराष्ट्रासाठी परवा २ मेला अवकाळीचा आठवड्याभरासाठी (३-१० मे) दिलेला अंदाज कायम असून आता कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातही दोन ते तीन दिवस खालील तारखांना व जिल्ह्यात अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपीटीची शक्यताही जाणवते.
नाशिक धुळे नंदुरबार जळगांव – ४ ते ७ मे (रविवार ते बुधवार)
नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर – ६ व ७ मे ( मंगळवार बुधवार)
संपूर्ण मराठवाडा- बुधवार ७ मे
संपूर्ण विदर्भ – ४ व ५ मे (रविवार- सोमवार)
२- दिवसाची तापमाने ही खालीप्रमाणे
कोकण ३४ ते ३५ डिग्री, मध्य महाराष्ट्र ३७ ते ४२, मराठवाडा ४१ ते ४२ डिग्री, विदर्भ ४२ ते ४४ डिग्री. असे असले तरी कमाल व किमान तापमाने ही सरासरी व काही ठिकाणी सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे मे महिना असूनही, उष्णतेच्या तापेपासून ही सुसह्यताच आहे, असे समजावे.
संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा उष्णतेच्या लाटेची शक्यता कुठेही सध्या जाणवत नाही.
३- गारपीटीची शक्यता कशामुळे?
छत्तीसगड वर घड्याळ काटा दिशेच्या विरुद्ध फिरणाऱ्या आवर्ती व अरबी समुद्रात दीड किमी. उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती अशा दोन्हीही चक्रीय वाऱ्यांच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता या दोन तीन दिवसात निर्माण झाल्याचे जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.