माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१- मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रूपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे आज सकाळ पर्यंत हवेच्या तीव्र कमी दाबात रूपांतराची व चंद्रपूर हिंगोली पैठण अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्या पासुन म्हणजे शनिवार २७ सप्टेंबर पासुन दसऱ्यापर्यंतच्या ६ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
२- त्यातही अतिजोरदार पावसाचे जिल्हे व तारखा खालील प्रमाणे.
शनिवार २७- मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव लातूर नांदेड
रविवार २८- मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक छ. सं. नगर व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा
सोमवार व मंगळवार दि. २९ व ३०- मुंबई पालघर ठाणे रायगड व नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा
३- उघडीपीची शक्यता-
शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पासुन पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते.
४-नद्यांच्या खोऱ्यातील जल आवक व धरण जल -संचय –
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे या नद्यांच्या धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune