शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

यंदाचा २०२५ चा पावसाळा सरासरीपेक्षा अधिकच कोसळणार…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

एप्रिल 17, 2025 | 7:14 pm
in संमिश्र वार्ता
0
rain1

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
देशात जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीत देशात ९६ ते १०४ टक्के श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरी इतका पाऊस मानला जातो. तर १०५ ते ११०% श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेच्या श्रेणीत मोडतो.

भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या अंदाजानुसार ह्या वर्षी येत्या पावसाळ्यात, जून -सप्टेंबर २०२५ ह्या चार महिन्याच्या कालावधीत देशात गुणात्मकदृष्ट्या (क्वान्टीटेटिवली) १०५%±५% पाऊस अपेक्षित आहे, कि जो (१०५ ते ११०%) श्रेणीत म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या श.क्यतेच्या श्रेणीत मोडतो. मागील वर्षी २०२४ च्या मॉन्सून वर्षात ही शक्यता जवळपास इतकीच म्हणजे १०६% होती.

त्यामुळे अंकानुसार नकारात्मक शक्यतेच्या जरी विचार केला तरी ही शक्यता (१०५% वजा ५%) म्हणजे तरीदेखील ती १००% येते, कि जी सरासरीइतक्या म्हणजे (९६ ते १०४%) पावसाच्या श्रेणीत मोडते. तर त्याचबरोबर अंकानुसार सकारात्मक शक्यतेचा विचार केल्यास ही शक्यता (१०५+५) ११० % येते, कि जी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे(१०५ ते ११०%) पावसाच्या श्रेणीत मोडते.

आता ‘पूर्वानुमान(भाकीत) संभाव्यता’ व ‘वातावरणीय (वातावरणीय)जलवायु संभाव्यता’ म्हणजे काय ? ह्या दोन्हीही संभाव्यतां(शक्यतां) ची संकल्पना स्पष्ट करतांना, असे म्हणत येईल की, संपूर्ण २०२४-२५ वर्षात जागतिक पातळीवरून गेल्या ८ महिन्यापासुन भाकीतासाठी आवश्यक असलेली जागतिक स्थरावरील सर्व हवामान घटकांची माहिती गोळा करून केलेल्या निरीक्षणांची नोंद व त्यावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजेच ‘पूर्वानुमान(भाकीत) संभाव्यता’ होय.
तर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या डेट्यावरून सांखिकीच्या आधारावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजे ‘जलवायु(वातावरणीय) संभाव्यता’ होय.

ह्या दोन्हीही संभाव्यता ह्या वरील रकाण्यात दाखवल्या आहेत. परंतु मान्सून च्या अंदाजातील उपलब्ध वरील डेटा रकाण्यावरून ‘पूर्वानुमान(भाकीत) संभाव्यता’ च्या पाच ही श्रेणीतील आकडे पहिले असता असे जाणवते की, आता सरासरीपेक्षा अधिक व अत्यधिक पावसाची शक्यता असलेल्या पूर्वानुमान संभाव्यता ह्या रकाण्यातील शेवटच्या ओळीत ३३+२६ अशी ५९% म्हणजे अत्यधिक शक्यता मानली जाते. म्हणजेच देशात सरासरीपेक्षा अधिक असलेला १०४% पेक्षा अधिक श्रेणीतील पाऊस होण्याची शक्यता ही ५९% आहे. आणि ही शक्यता खुपच बळकट असल्याची जाणवते. त्यामुळे देशात जून -सप्टेंबर २०२५ ह्या ४ महिन्याच्या कालावधीत सरासरी पेक्षा अधिक पावसाचीच शक्यताच अधिक आहे, हे येथे समजून घेण्याची गरज आहे.

ह्यावर्षी २०२५ च्या पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च एप्रिल व मे २०२५ पर्यन्त ‘एल -निनो-साऊथ ओसिलेशन्स ’ म्हणजे ‘एन्सो ‘ विषुववृत्तीय प्रशांत महासागरीय परिक्षेत्रात तटस्थ अवस्थेत कार्यरत आहे. परंतु एकंदरीत हवेच्या दाबाचे व वाऱ्यांचे पॅटर्न पाहता असेच दिसते की अजूनही ‘ ला-निना ‘ चा प्रभाव ह्या कार्यक्षेत्रात काहीसा टिकून आहे. असे जरी असले तरी पावसाळ्यातील चार महिन्यात ‘एल -निनो-साऊथ ओसिलेशन्स ’ म्हणजे ‘एन्सो ‘ ची ही अवस्था तटस्थच राहण्याची शक्यता अधिक आहे. अशी अवस्था म्हणजेच ना ‘ला-निना’ किंवा ना ‘एल-निनो‘. म्हणजे येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्यासाठी कोणताही वातावरणीय घटकांचा अटकाव होण्याची शक्यता ह्या अंदाजात जाणवत नाही.

पावसाळ्याच्या जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीतील ह्या वर्षी एन्सो तटस्थेचा काळ कि जो मान्सूनला पूरक ठरणारा असल्यामुळे पावसास अनुकूल असणार आहे. परंतु पूर्वार्धात म्हणजे जून व जुलै ह्या दोन महिन्याचा हा काळ मान्सूनच्या आगमनाच्या संक्रमणाचा काळ असतो. त्यात पूर्व- मान्सून सरीही कोसळत असतात. परंतु मान्सूनच्या वाटचालीत मान्सून करंट काय असेल, ते त्या वेळच्या प्रणालीवर अवलंबून असेल.

भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ (इंडियन ओशन डायपोल)ची जेंव्हा धन अवस्था असते म्हणजे अरबी समुद्र पाण्याचे तापमान अधिक तर बंगालचा उपसागर पाण्याचे तापमान कमी असते तेंव्हा भारतात पावसाळ्यात पाऊस पडण्यासाठी ही स्थिति अधिकच पूरक असते. परंतु ह्या दोन्हीही सागरीय पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेंव्हा समसमान असते तेंव्हा ति तटस्थ अवस्था मनाली जाते.
भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ (इंडियन ओशन डायपोल) आयओडी हा सुद्धा भारत देशाचा अधिक पाऊस पाडणारा ‘ ला-निना ‘च समजला जातो,
ह्यावर्षी २०२५ सध्याच्या पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च एप्रिल व मे २०२५ भारतीय महासागरात ‘ भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ (इंडियन ओशन डायपोल) तटस्थ अवस्थेत आहे. येत्या जून -सप्टेंबर ४ महिन्यातही अवस्था तटस्थच राहण्याची शक्यता सध्या जाणवत आहे.

ह्या घटकामुळे येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्यासाठी अरबी समुद्र व बंगालचा उपसागर ह्या दोन्हीही सागरीय पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान समसमान राहून ही स्थिति संपूर्ण पावसाळ्यात ह्या वर्षी पाऊस पडण्यास पूरक नसली तरी कमीत कमी अटकाव करणारी नाही, ही जमेची बाजू समजावी.

शिवाय २०२५ च्या ह्या गेलेल्या जानेवारी ते मार्च तीन महिन्यात पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वीच्या उत्तर अर्ध गोलार्धातील अमेरिका-कॉन्टिनेन्टल ,आर्टिक सर्कल, अलास्का, डेन्मार्क(ग्रीनलॅंड) तसेच यूरेशिया म्हणजे ४५ डिग्री उत्तर अक्षवृत्ताच्या उत्तरेकडील चीन, रशिया युरोप तिबेटचे पठार हिमालयाच्या उत्तर भागातील बर्फाळ परिक्षेत्रात सरासरीपेक्षा कमी झालेली हिमवृष्टीची अवस्था देशातील मान्सूनला अधिक पूरक असून देशाला सरासरीपेक्षा अधिक पाऊस देण्याची शक्यता जाणवत आहे. ह्या भागातील कमी हिमवृष्टी म्हणजे भारत देशात अधिक पाऊस पडण्यासाठी अनुकूलताच मानली जाते.

महाराष्ट्रासाठी काय?
महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. टरसाइल’ श्रेणी प्रकारनुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक म्हणजे १०५ % पेक्षा अधिक पावसाचीच शक्यता असुन ही शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५% जाणवत आहे. मराठवाडा व कोकणात ही स्थिति ६५% जाणवत आहे. मात्र ह्या सरासरी पेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेमुळे हा अधिक पावसाचे वितरण कसे होते ह्यावरच पडणारा पाऊस लाभदायी कि नुकसानदेही ह्याचे उत्तर येणारा काळच देईल, असे वाटते.

मॉन्सूनच्या आगमनासंबंधी
सरासरी तारीख १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. अर्थात केरळात आगमन झाल्यानंतरच मुंबईतील त्याच्या आगमनाची तारखेचा अंदाज बांधता येतो. मॉन्सून आगमन कालावधीत खालील ६ वातावरणीय घटकांच्या निरीक्षणानुसार मॉन्सूनच्या आगमनाची स्थिति त्या त्या वेळेस सांगितली जाते.

खरं तर मुंबईतल्या आगमनानंतरच तो उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येतो. हे जरी खरं असले तरी मान्सूनचे आगमन व ४ महिन्यात पडणारा मान्सून ह्या दोन स्वतंत्र गोष्टी असुन त्यांच्या भाकीतांचे निकषही स्वतंत्र आहेत.

i)वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान,
ii) दक्षिण भारतातील ४ राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन,
iii) दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दिर्घलहरी उष्णता ऊर्जा,
iv) मलेशिया थायलंड पश्चिम कि. पट्टीवर १ ते दिड किमी. दरम्यानचे वाहणारे वारे
v) वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब
vi) बंगालच्या उपसागरातील, बांगला देश, इंडो्नेशिया, दरम्यानचा, पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा अश्या ह्या ६ घटकांचे सतत निरीक्षणावरून हा मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो. ३१ मे च्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाजात मॉन्सून आगमना संबंधी सविस्तर खुलासा केला जातो. तेंव्हाच अंदाजे मुंबईमध्ये मान्सून कोणत्या तारखेला दाखल होईल, हे कळते.

एकंदरीत देशात ह्या २०२५ च्या वर्षी ‘ एन्सो ‘ व आय.ओ.डी. ची तटस्थ अवस्था आणि पृथ्वीच्या उत्तर अर्ध गोलार्ध तसेच यूरेशियातील कमी हिमवृष्टीने आच्छादलेले परिक्षेत्र पावसासाठी अनुकूलता दर्शवून सरासरी पेक्षा अधिक पाऊस होण्याच्या शक्यतेमुळे देशातील शेतकऱ्यांच्या आशा अधिकच पल्लवीत केल्या आहेत.

माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हा नवीन पॉवरहाऊस ‘ए९५ ५जी’ स्‍मार्टफोन लाँच…जाणून घ्या फोनची वैशिष्ट्ये व किंमत

Next Post

या पुरस्कारांची घोषणा…महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल देवगण, मुक्ता बर्वे व भीमराव पांचाळे यांचा होणार सन्मान

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या पुरस्कारांची घोषणा…महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल देवगण, मुक्ता बर्वे व भीमराव पांचाळे यांचा होणार सन्मान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011