माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ.सं.नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यात व परिसरात मंगळवार व बुधवार १ व २ एप्रिललाया दोन दिवसात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता जाणवते.
महाराष्ट्रात ढगाळ तसेच गडगडाटीचे वातावरण जरी सोमवार ७ एप्रिलपर्यन्त असले तरी या वातावरणाचा शेतपिक काढणीच्या सध्याच्या काळात, परिणामकारक प्रभाव मात्र मंगळवार ते शुक्रवार १ ते ४ एप्रिलपर्यंतच्या चार दिवसात अधिक असण्याची शक्यता जाणवते. गारपीट होण्याची शक्यता मात्र मंगळवार व बुधवार दि. १ व २ एप्रिलला या दोन दिवसातच वर स्पष्टीत क्षेत्रात जाणवते. त्यातही दरम्यानच्या काळात वातावरणात जर काही बदल झालाच तर खुलासा करता येईल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.