सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

येथे देवाला चक्क वाहतात चपला; या धार्मिकस्थळाला आवर्जून भेट द्या

by Gautam Sancheti
जून 16, 2022 | 10:22 pm
in इतर
0
IMG 20210111 WA0021

 

हटके डेस्टिनेशन
आरवलीचा वेतोबा 

आपल्या देशात अनेक पुरातन मंदिरे आहेत व जवळपास सर्वच मंदिरात देवाला फुले/कपडे/मिठाई आदी वस्तू अर्पण करण्याची साधारण प्रथा असते. पण कोकणात असे एक मंदिर आहे जिथे देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी चक्क चपला वाहण्याची प्रथा आहे. आज या अनोख्या पर्यटनस्थळाविषयी जाणून घेऊया…

भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगूर्लाा तालूक्यातील आरवली येथे हे आगळे वेगळे श्री देव वेतोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. आरवली गाव हे अरबी समुद्राच्या किनारी शिरोड्याजवळ वसलेलं छोटंसं गाव आहे. भरगच्च नारळ-पोफळींच्या बागा, कौलारु घरे, तांबडी माती व स्वच्छ सागर किनारा यामुळे आरवली गाव एक टिपीकल कोकणी गाव आहे असे म्हणता येईल. अशा या आरवलीच्या वेतोबाचे देऊळ इ.सन १६६० मध्ये बांधण्यात आले असल्याचा उल्लेख आढळतो. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर मूलत: वेताळाचे आहे. “बा” हा आदरार्थी शब्द जोडल्याने वेताळाचे वेतोबा झाले असावे असे जाणकार सांगतात.

मंदिराच्या प्रथम दर्शनीच देव वेतोबाची सात फूट ऊंचीची मूर्ती आकर्षित करते. वेतोबाची मूर्ती पूर्वी फणसाच्या लाकडाची होती.  अगदी अलिकडे सन १९९६ मध्ये ही मूर्ती पंचधातूत घडविण्यात आली. मात्र त्यामुळेच आजही स्थानिक लोक फणसाचे लाकूड बांधकामात व इतर कामासाठी वापरत नाहीत. आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्थानिक लोक चपला वाहण्याचा नवस बोलतात.

गावात फिरण्यासाठी देवाला चपला वाहतात. देवासमोर वाहिलेल्या या चपलांचे तळ दुसर्‍या दिवशी झिजलेले आढळतात, असे स्थानिक गावकरी सांगतात. या नवसाच्या चपलांचे मंदिरात हजारो जोड पडून आहेत. कित्येक खोल्या फक्त या नवसाच्या चपलांनी भरुन गेल्या आहेत. तळकोकणात वेताळ देवाची सुमारे १५० मंदिरे आहेत, पण चपलांचा नवस बोलण्याची प्रथा फक्त आरवलीलाच आहे. अशा या निसर्गरम्य आरवली गावास एकदा भेट द्यायलाच हवी.

कसे पोहचाल
आरवली येथे विमानाने जायचे असेल तर फक्त ७५ किलोमीटरवर गोव्याचा विमानतळ आहे. लवकरच येथून जवळ ४५ किमीवरील चिपी विमानतळावरुन विमानसेवा सुरु होईल, असा प्रयत्न सुरु आहे. तेथून टॅक्सीने वा बसने आरवलीस सहज पोहचता येते. रेल्वेने जायचे झाल्यास कोकण रेल्वेमार्गाने प्रथम सावंतवाडी व नंतर टॅक्सीने पोहचता येईल. रस्तामार्गेही मुंबई-गोवा हायवेने सावंतवाडी मार्गे आरवलीस जाता येते. सावंतवाडी ते आरवली हे अंतर २८ किमी एवढे आहे.

काय बघाल
यात तळ कोकणातील किमान ३० लहान-मोठे सागर किनारे आहेत जे आरवली येथून सहज बघता येतील. मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला, तेरेखोल, धामापुर, रेडी गणेश, सांवतवाडी अशी असंख्य पर्यटन स्थळे बघण्यासाठी आहेत. त्यामुळे वेळ भरपूर हवा.

कुठे रहाल
संपूर्ण कोकणात घरगुती व्यवस्था आहेत तशा येथेही असंख्य राहण्याच्या-जेवणाच्या व्यवस्था आहेत. नारळ-सुपारीच्या बागेतील समुद्रकिनारी असलेल्या या ठिकाणी कोकणी माणसांच्या घरात राहणेचे सुख पंचतारांकीत हाॅटेलमध्येही मिळणार नाही.

जेवण
कोकणातील महिलांनी बनवलेले कोंबडीवडे, सोलकढी, आंबोळी, घावणे, ताजी मासोळी, उकडीचे मोदक अशा चटकदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोकणात जायलाच हवे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १७ जून २०२२

Next Post

सराईत गुन्हेगाराला पकडण्यात नाशिक पोलिसांना यश; तब्बल १४ घरफोड्या आणि अन्य गुन्ह्यांची कबुली

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
nashik city police

सराईत गुन्हेगाराला पकडण्यात नाशिक पोलिसांना यश; तब्बल १४ घरफोड्या आणि अन्य गुन्ह्यांची कबुली

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011