इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मी, माझं नाव, माझं कर्तृत्व, आज मी जो काही आहे जेवढं नाव कमावलं आहे, ते माझ्या पत्नीमुळेच असे विनोदी अभिनेता समीर चौगुले यांनी सांगितलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता समीर चौगुले यांनी आपल्या आयुष्यातील भावनिक सत्य सांगितले आहे.
समीर चौगुले हे नाव आज प्रत्येकाला माहीत आहे. याचे कारण छोट्या पडद्यावरील हास्यकलाकार म्हणून समीर आज घराघरात पोहचला आहे. दिवसभरातील थकवा या हास्यकलाकारांच्या अभिनयाने अलगद नाहीसा होत असतो. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे हे कलाकार अनेक संघर्षातून जात असल्याचे सत्य समीर याने सांगितले आहे. समीर याची गोष्ट ही जणू एका सिनेमाचे कथानकच आहे की काय याचा आभास होतो.
समीर आणि त्याची पत्नी कविताची लव्हस्टोरी अगदी वेगळी आहे. या दोघांचा प्रेमविवाह आहे. एकाच नाटकातल्या ग्रुपमध्ये आम्ही दोघं होतो. तेव्हापासून आमच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. येत्या नोव्हेंबरला आमच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण होतील. त्याआधी आमचं काही वर्ष अफेअर होतं. मी कसा खोटं वागतो, कसं खरं वागतो हे सगळं तिला बरोबर माहित आहे. माझ्या पडत्या काळात तसेच उत्पन्नाच्याबाबतीत स्थैर्य नसताना तिने मला खूप पाठिंबा दिला. स्वतः नोकरी केली, स्वतःच्या गरजा कमी करून माझ्या पाठिशी उभी राहिली. कुठलीच तक्रार तिने माझ्यापर्यंत येऊ दिली नाही. माझं करिअर तिने मला करू दिलं. असं समीर आवर्जून सांगतो. समीरच्या सांगण्यानुसार यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याचे जिवंत उदाहरण हे जोडपं म्हणता येईल.
Hasyajatra Fame Actor Samir Chaughule Love story
Entertainment