मेरठ (उत्तर प्रदेश) – जगात कोणत्याही एतिहासिक शहरात उत्खनन केले तर काही तरी नक्कीच हाती लागते. त्यामुळेच जगभरातून आश्चर्य वाटावे अश्या बातम्या कानावर येत असतात. अलीकडेच महाभारतकालिन हस्तिनापूरमध्ये एतिहासिक नाणी सापडल्याची बातमी पुढे आली आहे.
हस्तिनापूर येथे माँ कामाख्या सिद्धपिठात साफसफाईच्या दरम्यान प्राचीन सिक्के व एक माणिक हाती लागला आहे. माँ कामाख्या सिद्धपीठ मंदिराच्या प्रांगणात नॅचरल सायन्सेस ट्रस्टद्वारा परिक्रमा मार्गाचे सफाई कार्य सुरू आहे. मातीला समतोल करून झुडप हटविण्यात येत आहे.
साफसफाई सुरू असताना ट्रस्टचे चेअरमन प्रियंक भारती यांना याठिकाणी तांब्याची दोन प्राचीन नाणी आणि टेराकोटाचा एक मणी सापडला. सर्व वस्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात आल्या.
त्यांनी सांगितले की गेल्या वर्षी मंदिराच्या प्रांगणात एतिहासिक साहित्य सापडले होते. त्यानंतर या जागेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी प्रोजेक्टही बनवून पाठविण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रो. प्रियंक या ठिकाणी माँ कामाख्या देवीची पुजा-अर्चना करायचे. सिद्धपिठावर त्यांनी रामनवमीची पुजासुद्धा केली. त्यानंतर कार्यालयात जाऊन नाण्यांचा अभ्यास केला.